Pune Corona Update: पुणे शहरात बुधवारी २ हजार ८४६ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:34 IST2022-02-09T20:34:29+5:302022-02-09T20:34:37+5:30
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार २६८ इतकी आहे

Pune Corona Update: पुणे शहरात बुधवारी २ हजार ८४६ जण कोरोनामुक्त
पुणे : शहरात बुधवारी ७ हजार ३७३ कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यापैकी १ हजार १७२ कोरोनाबाधितांचे निदान झाले. तर, २ हजार ८४६ जण कोरोनामुक्त झाले. बुधवारी १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार २६८ इतकी आहे.
सध्या ६५ कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर २१४ रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांपैकी केवळ ७.२५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, इतर रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. शहरात सध्या ४७५ व्हेंटिलेटर बेड आणि ४०१९ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. शहरात आजपर्यंत ४४ लाख १० हजार ७०१ रुग्णांची कोरोना चाचणी झाली. त्यापैकी ६ लाख ५४ हजार ४२८ जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यापैकी ६ लाख ३४ हजार ८४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ९ हजार ३१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.