अवसरी : अवसरी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी मंदिरापासून २०० फूट अंतरावर नेऊन सुमारे अडीच लाख रूपयांचे ऐवज आणि रोकड चोरून नेली आहे. ही घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. एका महिन्यातला दानपेटी फोडण्याचा हा दुसरा प्रयत्न झाला. मंचर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गुरुवारी पहाटे दोन वाजता मंदिराचे कुलूप तोडून चोरटयांनी मंदिरात प्रवेश केला . त्यानंतर दानपेटीतील सोन्या-चांदीच्या दागिने, आणि रोकड रक्कम असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. पहाटे पाच वाजता मंदिराचे पुजारी तुकाराम खेडकर देवाची पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता मंदिराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुजारी तुकाराम खेडकर यांनी ग्रामस्थांना व पोलीस पाटील संतोष शिंदे यांना मंदिरातील चोरीची माहिती कळविली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस सागर गायकवाड यांनी पाटील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.
अवसरी येथे मंदिरातील दानपेटी फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:03 IST
अवसरी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडत सुमारे अडीच लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. आहे.
अवसरी येथे मंदिरातील दानपेटी फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास
ठळक मुद्देएका महिन्यातला दानपेटी फोडण्याचा हा दुसरा प्रयत्न