Pune: सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
By नम्रता फडणीस | Updated: March 6, 2024 15:45 IST2024-03-06T15:41:25+5:302024-03-06T15:45:01+5:30
याप्रकरणी महिलेने सिहंगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

Pune: सिंहगड रस्ता परिसरात एकाच दिवशी २ चोऱ्या; सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (दि. ५) एकाच दिवशी वडगाव बुदृक आणि न-हे भागात दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मंगळसूत्र चोरटयांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल रस्त्यालगतच्या रस्त्यावर ६६ वर्षीय महिला चालण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. याप्रकरणी महिलेने सिहंगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करीत आहे.
न-हे भागातील वाल्हेकर चौकात दुसरी चोरीची घटना घडली. एक ४५ वर्षीय महिला मॉर्निंग वॉक करत असताना एकाने धक्का मारून त्यांच्या गळ्यातील ४० हजार किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक सणस करत आहेत.