ओतूरला १८ हजार ८३२ कांदा पिशव्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST2021-05-07T04:11:32+5:302021-05-07T04:11:32+5:30
ओतूर : येथील उपबाजारात गुरुवारी कांद्याच्या १८ हजार ८३२ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार ...

ओतूरला १८ हजार ८३२ कांदा पिशव्यांची आवक
ओतूर : येथील उपबाजारात गुरुवारी कांद्याच्या १८ हजार ८३२ कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार नं १ गोळा कांद्यास १० किलोस १२० ते १४५ रुपये गुरुवारी बाजारभाव मिळाल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव : कांदा नं १ (गोळा) १२० ते १४५ रुपये.
सुपर कांदा - १०० ते १२० रुपये. कांदा नं २ (कवचट) ८० ते १०० रुपये.
कांदा नं.३(गोल्टा)- ६० ते ८० रुपये. कांदा नं ४(गोलटी / बदला) १० ते ६० रुपये.
बटाटा बाजारभाव : गुरुवारी ३५९ बटाटा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस ३० ते १७० रुपये बाजारभाव मिळाला. या आठवड्यात बटाटा बाजार भाव स्थीर आहेत अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील आठवड्यात दोन दिवस मार्केट बंद होते. हा निर्णय व्यापारी व आडतदारानी घेतला होता.
उपबाजारात कांदा, बटाटा घेऊन येणाऱ्या वाहनांवर प्रवेशद्वारातच जंतुनाषक फवारणी करून आत प्रवेश दिला जातो.