शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Accident: इंदापूरात लक्झरी बस आणि ट्राॅलीच्या धडकेत १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 16:43 IST

आदित्यराज विश्वास देवकाते असे अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा आहे

बाभुळगाव : इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर उसाने भरलेल्या ट्रॉलीला बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये ट्रॉलीशेजारी उभे असलेले तिघे जखमी झाले आहेत. त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयात दाखल केले असता त्यापैकी एका अल्पवयीन मुलाचा मृत्यूची झाल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.   

आदित्यराज विश्वास देवकाते(वय १७) असे अपघातातमृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विश्वास देवकाते यांचा तो मुलगा आहे. या अपघातात आदित्यराजचे वडील विश्वास रंगनाथ देवकाते (रा.देवकाते वस्ती मदनवाडी, ता.इंदापूर)  व संतोष अंकुश पवार (रा.पोंधवडी, ता.इंदापूर) अशी जखमींची नांवे आहेत. याबाबत राजेंद्र सर्जेराव देवकाते(वय३८ रा.मदनवाडी,ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

गुरूवारी रात्री उसाने भरलेल्या दोन ट्राॅलीसह पुणे सोलापूर हायवे रोडवरून सोलापूरकडे जात होता. गागरगाव जवळ ट्रॉलीचे मागचे टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला हे तिघे ट्राॅलीचे चाक बदलत होते. त्यावेळी पाठीमागून येणार्‍या लक्झरी बसने चालकाचा ताबा सुटल्याने ती ट्राॅलीला जोरात धडकली. 

घटना समजताच पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार भागवत शिंदे, पोलीस हवालदार उमेश लोणकर व पोलीस नाईक नितीन जगताप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खासगी वाहनाने इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारसाठी पाठवण्यात आले. उपचार घेत असताना आदित्यराज विश्वास देवकाते याचा मृत्यू झाला. आदित्यराजच्या मृत्युने मदनवाडी गावावर शोककळा पसरली असून नागरीकातून हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस