लासुर्णे पेयजल योजनेसाठी १७ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:34 IST2018-08-26T00:34:25+5:302018-08-26T00:34:41+5:30
येथील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता, येथे पूर्वी असणाऱ्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी व फिल्टर यंत्रणेसाठी

लासुर्णे पेयजल योजनेसाठी १७ कोटींचा निधी
लासुर्णे : येथील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता, येथे पूर्वी असणाऱ्या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी व फिल्टर यंत्रणेसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून १७.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
लासुर्णे गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सागर भोसले व पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. निधीसाठी आमदार बाळासाहेब भेगडे व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकार्य केले. जुन्या विहिरींना फिल्टर बसविणार असून तलावाची साठवण क्षमता वाढवून तलावामध्ये काँक्रिटीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले. वाड्यावस्त्यांवर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. लासुर्णे गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून नीरा डाव्या कालव्यावरून नवीन पाईपलाईन करणार आहे.