शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

बैलाच्या हौसेसाठी मोजले तब्बल साडेसोळा लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 12:38 IST

एका शेतकऱ्याने बैलाची आवड, त्यावर असलेले प्रेम आणि जिव्हाळ्यापोटी मोजले तब्बल साडेसोळा लाख रुपये

ठळक मुद्देमावळ येथील शेतकरी

शिक्रापूर : शेतकऱ्याचा आवडता मित्र म्हणजे बैल. शेतीकामात नेहमी मदतीला येणारा... बळीराजाच्या सुख-दु:खात कायम सोबत असणाऱ्या बैलाला आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत खूप महत्त्व आहे. आजच्या तांत्रिक युगात बैलाचे महत्त्व कमी होत असताना मात्र मावळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने बैलाची आवड, त्यावर असलेले प्रेम आणि जिव्हाळ्यापोटी तब्बल साडेसोळा लाख रुपये मोजले आहेत. एवढेच नाही तर वाजतगाजत या बैलाची मिरवणूक काढत त्याला शेतकऱ्याने घरी आणले. त्याच्या या हौसेची सर्वत्र चर्चा होत आहे.  नवलाख उंबरे मावळ येथील पंडितमामा जाधव असे या हौशी शेतकऱ्याचे नाव आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील पिंपळवाडी येथील शेतकरी अमोल दगडू जाधव व लोहगाव येथील हरीशेठ पवार यांना असलेल्या बैलांची आवड व त्यांचा सांभाळ करण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट घेत चांगल्या तयार केलेल्या बैलांना चांगली किंमत मिळत आहे. यांच्याकडे असलेल्या मॅगीनामक बैलाला पंडितमामा जाधव यांनी तब्बल १६ लाख ५१ हजार रुपये मोजल्याने हा बैल सध्या या भागात चर्चेचा विषय ठरला आहे.शेतकऱ्यांच्या आवडत्या शर्यती न्यायालयाच्या बंदीमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत.  मात्र, भविष्यात ही बंदी उठून पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू होतील, या आशेत आजही अनेक शेतकरी आहेत. शर्यतबंदी असतानाही या बैलांना भार न समजता त्यांचा चांगला सांभाळ करणारे शेतकरी आहेत. या बैलगाडा शौकिनांसाठी अमोल जाधव व हरीशेठ पवार जातिवंत बैलाची निर्मिती करीत आहेत. त्यांनी सांभाळलेल्या मॅगी या बैलाची तब्येत, नजर आणि धावण्याची लकब लक्षात घेऊन  नवलाख उंबरे मावळ येथील पंडितमामा जाधव या शेतकºयाने या बैलाला १६ लाख ५१ हजार रुपये मोजत त्याला पाबळ येथून वाजतगाजत घरी नेले.

टॅग्स :PuneपुणेmavalमावळFarmerशेतकरी