शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; तर बहीण गंभीर जखमी, शिरूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 18:13 IST

तरुणीच्या विवाहित बहिणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

रांजणगाव सांडस :  शिरूर तालुक्यातील सादलगाव येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वीज पडून तरुणी मृत्युमुखी पडली आहे. रिता सिताराम नाईक ( वय १६ वर्षे, मूळ राहणार आडशी, या. जि. नंदूरबार) असे या तरुणीचे नाव आहे. तर या तरुणीची विवाहित बहीण गीता राजेश वळवी ही यामध्ये जखमी झाली आहे. गीता वर मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.         उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना पाऊस सुरू झाला होता. पाऊस पडत असताना या दोघी बहिणी उसाच्या फडातून ट्रॅक्टर कसा येईना हे पाहण्यासाठी रस्त्यावर आल्या होत्या. यावेळी या दोघींवर वीज पडली. यात रीता व गीता या दोघी बहिणी बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मांडवगण फराटा  प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी रीताला मृत घोषित केले. तर बेशुद्धावस्थेतील गीता हीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठवले. गीता हीची प्रकृती गंभीर असल्याचे वरद विनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील पवार यांनी सांगितले. मृत रीता हीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरRainपाऊसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल