शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून कारवाई मोहीम तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 14:37 IST

निवासी व बिगरनिवासी अशा एकूण १०५१ मालमत्ता जप्त केल्या

पिंपरी : मार्चअखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार २६५ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. निवासी व बिगरनिवासी अशा एकूण १०५१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. कारवाईच्या वेळेस थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकराचा भरणा केल्याने १५ हजार २१४ मालमत्तांवर कारवाई केली गेली नाही.कर संकलन विभागास एक हजार कोटी रुपये वसुलीचे २०२४-२५ या आर्थिक वर्षांत उद्दिष्ट आहे. मार्च महिना संपण्यास केवळ १९ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल १६ हजार २६५ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.कारवाईच्या वेळेस एकूण १५ हजार २१४ मालमत्ताधारकांनी संपूर्ण बिल भरल्याने कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्याकडून एकूण १३८ कोटी ४१ लाख ७२ हजार ५७३ रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. १०५१ मालमत्ताधारकांनी कारवाईच्या वेळेस बिल न भरल्याने त्या मालमत्ता सील करून जप्त केल्या आहेत. या थकबाकीदारांकडून एकूण २६ कोटी ५५ लाख ३१ हजार ३१८ रुपये असा थकीत कर येणे बाकी आहे. दिवसभरात ४०७ मालमत्तांवर कारवाईकर संकलन विभागाच्या विविध १८ पथकांनी थकबाकीदारांच्या एकूण ४०७ मालमत्तांवर कारवाई केली. त्यातील ४०४ थकबाकीदारांनी कारवाईच्या वेळेस थकीत बिलाचा भरणा केला. ती रक्कम एकूण ३ कोटी ११ लाख ५९ हजार ७४८ रुपये इतकी आहे. त्यामुळे त्या थकबाकीदारांवर मालमत्ता सीलची कारवाई केली नाही, तर ३ जणांनी बिलाचा भरणा न केल्याने त्यांच्या मालमत्ता सील केल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण २ लाख ५९ हजार ४९३ रुपयांची थकबाकी आहे.

संपूर्ण बिल भरल्यानंतरच सील उघडणारकारवाईची वाट न पाहता थकबाकीदारांनी संपूर्ण थकीत मालमत्ताकर एकरकमी भरून महापालिकेस सहकार्य करावे. कर संकलन विभागाने वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. संपूर्ण बिलाचा भरणा केल्याशिवाय मालमत्तेस लावलेले सील काढले जात नाही. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. -अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, कर संकलन विभाग

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTaxकर