शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात महाराष्ट्र बंद दरम्यान तोडफोड करणा-या १५५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 20:18 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या १५५ जणांवर बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड, येरवडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देचांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांना धक्काबुक्की

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या १५५ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले. त्यापैकी एका पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे. बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. काही तरुण सुरक्षारक्षकाच्या खोलीच्या छतावर चढले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. चांदणी चौकात पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवलो. डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी पीएमपी बस तसेच काही दुकानांवर दगडफेक केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून १५५ जणांना अटक करण्यात आली. बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड, येरवडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी दहा गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कार्यालयासमोर दहशत निर्माण करणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदPoliceपोलिस