Pune Corona News: शहरात रविवारी १६९ कोरोनामुक्त तर १५१ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 21:38 IST2021-10-03T21:37:51+5:302021-10-03T21:38:41+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ५६४ संशयितांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: शहरात रविवारी १६९ कोरोनामुक्त तर १५१ नवे रुग्ण
पुणे : शहरात रविवारी १५१ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ५६४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.३० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरात १ हजार ५१९ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २१४ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या १८८ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३३ लाख ९० हजार ३०५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख १ हजार ५०३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९० हजार ९४८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.