शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

मुंबई ते चेन्नई विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत पाठविले तब्बल १५ हजार टन पार्सल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 14:13 IST

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पार्सल सेवाही ठप्प झाली..

ठळक मुद्देऔषधे, वैद्यकीय उपकरणे, खाद्यान्न, भाजीपाला, ई-व्यापार सामान आदीचा समावेश

पुणे : लॉकडाऊनच्या काळात सुरू करण्यात आलेल्या मुंबई ते चेन्नई पार्सल विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत तब्बल १५ हजार टनांहून अधिक साहित्य पाठविले आहे. त्यामध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, खाद्यान्न, भाजीपाला, ई-व्यापार सामान आदीचा समावेश आहे. या गाडीला आता डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पार्सल सेवाही ठप्प झाली. यापार्श्वभुमीवर नागरिकांना अत्यावश्यक वस्तु उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने रेल्वेने एप्रिल महिन्यात देशभरातील काही शहरांदरम्यान विशेष पार्सल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई ते चेन्नईदरम्यानही गाडी सुरू करण्यात आली. ही गाडी प्रत्येक सोमवार व शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळली ७.३५ वाजता सुटून रात्री १०.४५ वाजता पुण्यात येते. तर दुसऱ्या दिवशी रात्री ११.२५ वाजता चेन्नई सेंट्रल स्थानकात पोहचते. चेन्नई येथून प्रत्येक बुधवार आणि रविवारी दुपारी १२.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.२० वाजता मुंबईत येते. ही गाडी पुण्यासह कल्याण, लोणावळा, सोलापुर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा व गुडूर या स्थानकांवर थांबते. रेल्वेने ही गाडी डिसेंबर अखेरपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष पार्सल एक्सप्रेसला नागरिक, व्यवसायिक, खासगी कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन महिन्यांत जून अखेरपर्यंत या गाडीने १५ हजार ६०० टनांचे पार्सल पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये ४ हजार ४४५ टनांचे खाद्यान, भाजीपाला आदीचा समावेश आहे. तसेच १ हजार ३४४ टनांची औषधे व वैद्यकीय साहित्यही पाठविण्यात आल्याने दिलासा मिळाला. ऑनलाईन खरेदी विक्री सुरू झाल्यानंतर तसेच पत्रव्यवहार सुरू झाल्यानंतर, ई-व्यापार आदीच्या २११ टन वस्तुंचीही यागाडीने पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.-------------पार्सल कार्गो एक्सप्रेसने केलेली वाहतुक  (३० जूनपर्यंत)औषधे, वैद्यकीय साहित्य - १,३४४ टनअन्नधान्य, भाजीपाला - ४,४४५ टनपत्र, ई-व्यापार वस्तु - २११ टनइतर साहित्य - ९,६०० टनएकुण - १५,६०० टन------------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेpassengerप्रवासीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस