शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १५० विद्यापीठांत लाेकपाल नियुक्त नाहीत; UGC कडून डिफाॅल्ट विद्यापीठांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 10:10 IST

लाेकपाल नियुक्त न केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ राज्य विद्यापीठांसह २ खासगी विद्यापीठांचा समावेश

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठांना लोकपाल नियुक्ती करण्याबाबत आदेश दिले आहेत. देशभरातील १५७ विद्यापीठांनी दि. १ जून अखेर लोकपाल नियुक्तीबाबतची माहिती युजीसीकडे सादर केलेली नाही. लाेकपाल नियुक्त न केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ राज्य विद्यापीठांसह २ खासगी विद्यापीठांचा समावेश आहे.             विद्यापीठ अनुदान आयोग (विद्यार्थी तक्रार निवारण) नियमावली-२०२३ बाबतचे राजपत्र गतवर्षी एप्रिल महिन्यात प्रसिद्ध केले हाेते, तसेच तीस दिवसांत लोकपाल नियुक्त करण्याची विनंती विद्यापीठांना करण्यात आली होती. दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत २५६ राज्य विद्यापीठे, १६२ खासगी विद्यापीठे, एक केंद्रीय विद्यापीठ, दोन अभिमत असे एकूण ४२१ विद्यापीठांनी लोकपाल नियुक्तीबाबत माहिती सादर केली नव्हती. त्यानंतर पुन्हा दि. १ जून अखेरपर्यंत लाेकपाल नियुक्तीबाबतचा आढावा घेतला असता, १५७ विद्यापीठांनी लाेकपाल नियुक्त केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये १०८ राज्य विद्यापीठे, ४७ खासगी आणि २ डिम्ड टू बी विद्यापीठांचा समावेश आहे, अशी माहिती युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

राज्यातील इंटरनॅशनल स्पाेर्ट्स युनिव्हर्सिटी, पुणे, महाराष्ट्र युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, नाशिक, लक्ष्मीनारायण इनाेव्हेशन टेक्नाॅलाॅजिकल युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र ॲनिमल ॲंड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र नॅशनल लाॅ युनिव्हर्सिटी तिन्ही नागपूर, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांसह एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई राज्य विद्यापीठांचा समावेश आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षाdelhiदिल्ली