शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पीएमपीच्या ताफ्यात आणखी १५० इलेक्ट्रिक बसची भर पडणार; पुणेकरांचा प्रवास अधिक सुखाचा होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 7:39 PM

एका बसची किंमत दीड कोटी आहे. त्यातील ५५ लाख रूपये केंद्र सरकार अनूदान देणार आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचे अर्थसाह्य: गिरीश बापट यांची राज्य सरकारवर टीकामहापालिका पेठांमधील मध्यवर्ती भागात गोलाकार फिरणाऱ्या ३०० बस खरेदी करणार

पुणे: केंद्र सरकारच्या फेम २ या शहरातील सार्वजनिक वाहतूकीसाठी अर्थसाह्य करणार्या योजनेतून पुण्यासाठी १५० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. महापालिका ३०० बस घेत आहे, केंद्र सरकार १५० बससाठी साह्य करत आहे, राज्य सरकारकडून मात्र काहीच मिळायला तयार नाही अशी टीका याबाबत माहिती देताना खासदार गिरीश बापट यांनी केली.

पीएमपीएलच्या मुख्यालयात खासदार बापट यांनी या खरेदीची माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपील संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यावेळी ऊपस्थित होते. 

केंद्र सरकारने पुणेकरांना दिलेला दिलासा असे वर्णन करून बापट म्हणाले, राज्य सरकार मात्र कसली मदत करत नाही, पण आम्ही त्यांच्याकडेही मदतीची मागणी करणार आहोत. इंधनाचा कमी होत जाणारा साठा व शहरांमधील वाढते प्रदूषण यावर पर्याय म्हणून केंद्र सरकार देशातील काही शहरांंना ही मदत देत आहे. एका बसची किंमत दीड कोटी आहे. त्यातील ५५ लाख रूपये सरकार अनूदान देणार आहे. एकूण १५० बस खरेदी होतील. खासगी कंपनीकडून ही खरेदी होईल. अनूदान त्यांंना मिळणार आहे. बसचा चालक, दुरूस्ती खर्च कंपनीकडे असेल. त्या बदल्यात त्यांना ६३ रूपये ९५ पैसे प्रतिकिलोमीटर भाडे देण्यात येईल. विद्यूत खर्च पीएमपीएल करेल.

'पीएमपी'कडून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड यांना १५० इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे. एव्ही ट्रान्स या 150 इलेक्ट्रिक बसेस ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडून खरेदी करणार आहे.आगामी एक वर्षाच्या कालावधीत ह्या सर्व बसेस वितरीत केल्या जाणार आहे.तसेच कराराच्या कालावधीत इलेक्ट्रिक बसेसची देखभाल देखील हीच कंपनी करणार आहे. 

व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी बसची तांत्रिक माहिती दिली. या बस बीआरटी मार्गावर चालवण्यात येतील. ३७ आसनक्षमता असणाऱ्या या बस संपुर्ण वातानुकुलित असतील. त्यापासून प्रदुषण होणार नाही. महापौर मोहोळ म्हणाले, बस खरेदी करण्याची मुदत संपली होती. ती वाढवून घेण्यात आली. आता करार वगैरे झाले असून एप्रिपासून बस यायला सुरूवात होईल. उपलब्घ होतील त्याप्रमाणे त्यांचा वापर करण्यात येणार आहे.

महापालिका पेठांमधील मध्यवर्ती भागात गोलाकार फिरणाऱ्या ३०० बस खरेदी करणार आहे. त्याचे दिवसभराचे तिकीट १० रूपये असेल. कोरोना आपत्तीमुळे या सगळ्या प्रक्रियेस विलंब झाला. मात्र आता प्रक्रिया पूर्ण झाली असून याही बस पीएमपीएलच्या ताफ्यात हळूहळू दाखल होतील.हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष,

या इलेक्ट्रिक बसेसची वैशिष्ट्ये... पीएमपीच्या लवकरच दाखल होणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांना सुखसोयीसाठी या 12 मीटर लांबीच्या वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन आहे. तसेच बसण्यासाठी 33 आसने व्हीलचेअर चालक अशी सोय आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, व्हीलचेअर, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स ची व्यवस्था करण्यात आली आहेत.  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारgirish bapatगिरीष बापट