शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

१५ हजार पुणेकर परदेशात चालवितात गाड्या, १५ हजार पुणेकरांनी काढले ‘इंटरनॅशनल लायसन्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:27 IST

भारतातील नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज

- अंबादास गवंडीपुणे : परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला आंतराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या तीन वर्षांत १४ हजार ७७४ पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात याची नोंद करण्यात आली असून, आंतराष्ट्रीय वाहन परवानाधारकांची संख्या वाढल्याचे दिसते.नोकरी, शिक्षणासाठी परदेशात राहणाऱ्यांची संख्या मोठी असून, अशा भारतातील नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते. यासाठी देशातील ज्या ठिकाणी तो राहायला आहे, तेथील आरटीओकडून त्याला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. २०१८ पूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअली असल्याने त्याला विलंब लागत असे. नागरिकांना परवाना काढणे सोपे जावे यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. यानुसार संबंधित अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवरून ‘सारथी’अंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा लागतो. या ठिकाणी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. या परवान्यासाठी संबंधित अर्जदाराकडे वाहन परवाना असल्यास पुन्हा वाहन चालवणे तसेच परीक्षा देण्याची गरज लागत नाही. मात्र, त्यांचे सध्याचे ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व व्हिसा याची पडताळणी केली जाते. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला मूळ कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष पडताळणीसाठी आरटीओत जावे लागते. यानंतर कागदपत्रांची तपासणी करून आरटीओतून त्याला एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.एका दिवसात वाहन परवानागेल्या तीन वर्षांत आंतराष्ट्रीय वाहन परवाना काढण्याचे प्रमाण वाढत असून, २०२२-२३ या वर्षभरात ४ हजार २९४, तर २०२३-२४ मध्ये ५ हजार २१० आणि जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ५ हजार २७० जणांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला आहे. सध्याचा वाहनचालक परवाना, पारपत्र, व्हिसा याची पडताळणी केल्यांनतर एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना देण्यात येतो.अशी आहे आकडेवारी२०२२-२३ - ४,२९४२०२३-२४ - ५,२१०जानेवारी ते डिसेंबर (२०२४ पर्यंत) - ५,२७०

केंद्रीय परिहवन विभागाकडून वाहनधारकांसाठी सुलभ प्रक्रिया करून दिली आहे. त्यामुळे परदेशात जाण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या पारपत्र, व्हिसाचा कालावधी आणि कागदपत्रांची पडताळणी करून परवाना देण्यात येत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRto officeआरटीओ ऑफीसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस