शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जिल्ह्यात १५ हजार दिव्यांग बजावणार मतदानाचा हक्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 20:13 IST

पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ होत असून आत्तापर्यंत जिल्ह्यात १५ हजार २४१ दिव्यांग मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. 

ठळक मुद्दे जिल्हा प्रशासनातर्फे दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम मतदान केंद्रावर व्हील चेअर,रॅम्प किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना

पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांगांच्या मतदानाची विशेष काळजी घेतली आहे.त्यामुळे अधिकाधिक दिव्यांगांना मतदान करता येणे शक्य होणार आहे. पुणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ होत असून आत्तापर्यंत जिल्ह्यात १५ हजार २४१ दिव्यांग मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनातर्फे दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली.सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांची नोंदणी करून घेतली जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेसमोर आठवड्याभरापासून दिव्यांगांची नोंदणी केली जात असून आत्तापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात येवून १८३ दिव्यांगांनी नोंदणी अर्ज भरले आहेत.जिल्ह्यात अंध,कर्णबधीर ,मुकबधीर आणि बहुविकलांग यांची नोंदणी करण्यात आली आहे.सुमारे दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात १३ हजार ७४९ दिव्यांग मतदार होते. परंतु,जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे त्यात सुमारे दोन हजाराने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांची संख्या १५ हजार २४२ झाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोजाने सर्व दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रावर व्हील चेअर,रॅम्प किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचना जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिल्या आहेत.त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून ३०० ते ४०० व्हील चेअर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले असून त्यात आवश्यकतेनुसार वाढ केली जाणार आहे.---------------------- 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण