शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गर्लफ्रेन्डला इंप्रेस करण्यासाठी चोरले १५ मोबाईल; आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 16:40 IST

आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्या साठी चोरी केले असल्याचे सांगितले

धनकवडी : गर्लफ्रेन्डला इंप्रेस करण्यासाठी १५ मोबाईल फोन चोरणाऱ्या दोघा सराईतांना ताब्यात घेण्यात, भारती विद्यापीठ पोलीसांना यश मिळाले असून अर्जुन महादेव शेलार, (वय १८ वर्षे ६ महीने, रा. मु.पो भिवरी, ना.पुरंदर, जि. पुणे) प्रेम राजु शेलार, (वय २० वर्षे, रा. मु.पो भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे कडून दोन लाख किंमतीचे पंधरा मोबाईल जप्त करण्यात आले.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खरगोई यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, कात्रज तलाव येथे दोन चोरीचे मोबाईल फोन विक्री करता आले आहेत. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अर्जुन महादेव शेलार, व प्रेम राजु शेलार, यांच्या ताब्यातील पिशवी तपासली असता त्यामध्ये मोबाईल मिळून आले. त्या मोबाईल फोनबाबत आरोपीतांकडे तपास करता त्यांनी सदरचे मोबाईल फोन हे कात्रज, गोकुळनर, कोंढवा भागातुन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यामधील एक मोबाईल फोन हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील असून उर्वरीत १४ मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे. आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे गर्लफ्रेंन्डला प्रत्येक वेळी वेगवेगळे मोबाईल फोन दाखवुन त्यांना इंप्रेस करण्या साठी चोरी केले असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेDhankawadiधनकवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल