शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Jalna Maratha Protest: एसटीला तीन दिवसांत १५ कोटींचा फटका; सेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 09:01 IST

पश्चिम महाराष्ट्र, कोकणकडे जाणाऱ्या गाड्या सुरळीत...

- अजित घस्ते

पुणे : मराठा आरक्षणासाठी उपाेषणाला बसलेल्या जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा परिणाम राज्यभर होत आहे. पुण्यातील शिवाजीनगर (वाकडेवाडी) बस सेवेला याचा माेठा फटका बसला आहे. सलग तीन दिवसांपासून बस सेवा विस्कळीत झाल्याने छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना, जळगाव, बीड या मार्गावरील बस सोडलेल्याच नाहीत. यामुळे तीन दिवसांत सुमारे ३० हजार फेऱ्या रद्द झाल्या आहेत. विविध भागांत आतापर्यंत १९ बस गाड्यांना आग लावली गेली. या तीन दिवसांत ‘एसटी’चे सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी देखील अनेक फेऱ्या रद्द झाल्या. वाकडेवाडीहून प्रवास करणाऱ्या सुमारे २८ ते ३० हजार प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

प. महाराष्ट्र, कोकण बससेवा सुरळीत :

सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणातील चिपळूण, मुंबईकडे जाणाऱ्या बसगाड्या सुरू झाल्या असून, कोल्हापूरवरून येणाऱ्या काही गाड्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. रस्ता मोकळा झाल्यानंतर गाड्या पुन्हा सुरू केल्या; तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या असल्याचे स्वारगेट आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी सांगितले.

सुमारे ३५० बस बंद :

वाकडेवाडी (शिवाजीनगर) बसस्थानकावरून दररोज अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा या शहरांसाठी सुमारे ३५० बसमधून प्रवाशांची वाहतूक होते, सध्या त्या बंद आहेत.

प्रवाशांची लूट

‘एसटी’ची सेवा ठप्प असल्याने खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना व नाशिकला जाणाऱ्या तिकीट दरात वाढ केली आहे. प्रवाशांना पर्याय नसल्याने जास्तीचे तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. बसस्थानकाच्या बाहेरच आठ ते दहा खासगी ट्रॅव्हल्स चालकांचा व्यवसाय सुरू आहे.

चालक-वाहकांचे हाल :

वाकडेवाडी आगार येथे मुक्कामी आलेले सिडको, चिखली, कोपरगाव व छत्रपती संभाजीनगर आगाराचे तीस चालक-वाहक पुण्यात अडकून पडले आहेत. त्यांना मूळ आगाराला ‘एसटी’ घेऊन जाण्याचे अद्याप आदेश नाहीत. त्यामुळे ते ज्या आगारात आहेत तिथेच थांबून आहेत. काही चालकांकडे जेवणासाठी देखील पैसे नसल्याने आगारातून आगाऊ रक्कम घेत आहेत.

तब्बल ४६ आगार बंद :

‘एसटी’च्या २५० पैकी ४६ आगार बंद आहेत. दोन दिवसांतील २६ लाख ५१ हजार किलोमीटरची वाहतूक झालेली नाही. यामुळे ८.५ कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. सोमवारी ६,२०० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे २ कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. ‘एसटी’चे तीन दिवसांत सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले आहे.

हे आहेत सध्याचे दर :

स्थळ : शिवाजीनगर एसटी - खासगी ट्रॅव्हल्स

नगर :             १७५             : ३५०

छत्रपती संभाजीनगर : ३७५ : ५००

नाशिक :             ३१५             : ४००

आंदोलनकर्त्यांकडून ‘एसटी’ गाड्या लक्ष्य होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संवेदनशील भागांत ‘एसटी’ची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. उर्वरित मार्गावर ‘एसटी’ची सेवा सुरळीत आहे. जे चालक-वाहक शिवाजीनगर येथे अडकून पडले आहेत त्यांची सोय करण्यात आली आहे.

- ज्ञानेश्वर रणवरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, शिवाजीनगर (वाकडेवाडी) बसस्थानक, पुणे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ