शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
6
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
7
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
8
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
9
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
10
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
11
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
12
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
13
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
14
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
15
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
16
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
17
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
18
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
19
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
20
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

१४ धरणे भरली; उजनी २३ टीएमसीवर, डिंभे धरणातून १७,८०० क्युसेक्सने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:02 AM

धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील तीन धरणांसह जिल्ह्यातील १४ धरणे भरली आहेत.

पुणे : धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीतील तीन धरणांसह जिल्ह्यातील १४ धरणे भरली आहेत. जिल्ह्यातील १५ धरणांतून पाणी सोडण्यात येत असून, उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २३.२४ अब्ज घनफुटांवर (टीएमसी) पोहोचला आहे.पिंपळगाव जोगे पाणलोट क्षेत्रात ६, माणिकडोह २८, येडगाव १२, वडज २१, डिंभे ४१, कळमोडी १९, चासकमान २४, वडीवळे १४, पवना २३, मुळशी २०, टेमघर २१, वरसगाव ३, पानशेत ४, खडकवासला २ आणि नीरा देवघरला ११ मिलिमीटर पाऊस गुरुवारी दिवसभरात झाला. गुरुवारी सकाळी आठपर्यंत कळमोडी १२, वडीवळे ४५, आंद्रा १५, पवना ३४, कासारसाई ७, मुळशी २५, टेमघर ४६, वरसगाव १६, पानशेत २०, खडकवासला ५, गुंजवणी ११ आणि नीरा देवघरला ३० मिलिमीटर पाऊस झाला.कळमोडी १.५१, चासकमान ७.५७, भामा आसखेड ७.१६, वडीवळे १.०७, आंद्रा २.९२, पवना ८.५१, वरसगाव १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.९७, नीरा देवघर ११.७३, भाटघर २३.५० आणि वीर धरणात ९.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. डिंभे १२.३८ (९९.०९), कासारसाई ०.५६ (९८.५७ टक्के), मुळशी १८.४१ (९९.७५ टक्के) ही धरणे जवळपास भरली आहेत.खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर (२.१७ टीएमसी) या चारही धरणांतील पाणीसाठा २७.६२ टीएमसीवर (९४.७४ टक्के) गेला आहे. सायंकाळी पाचपर्यंत वरसगाव धरणातून १ हजार ७७७, पानशेत ३ हजार ९०८ आणि खडकवासला धरणातून ४ हजार २८० क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मुळा-मुठा नदी दुथडी वाहत होती. वडज ५७७, डिंभे १३ हजार ३६५, कळमोडी २ हजार, चासकमान ४ हजार ८७३, वडीवळे २ हजार ८३, पवना दीड हजार आणि मुळशीतून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.वीर धरणातून १३ हजार ९९१, नीरा देवघर ७ हजार ९३८ आणि भाटघरमधून २ हजार ३२९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा २३.२४ टीएमसी (४३.३७ टक्के) झाला आहे.घोडेगाव : डिंभे धरण पूर्ण भरले असून, धरणातून १७,८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग घोड नदीत सोडण्यात आला आहे़ या पाण्यामुळे घोड नदीला पूर आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे़आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांबरोबरच अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊ स सुरू आहे़ यामुळे डिंभे धरणात १४,००० क्युसेक्सने पाणी येत आहे़ या पाण्यामुळे घोड नदी दुधडी भरून वाहू लागली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता के. आऱ कानडे यांनी आवाहन केले आहे, की अचानकसुरू झालेल्या पावसामुळे धरणातून मोठा विसर्ग सोडावा लागला आहे़ यासाठी नदीकाठच्या गावांनी दक्ष राहावे, नागरिकांनी नदीकाठी फिरू नये़ तसेच कुकडी प्रकल्पात ंिडंभे धरण हे महत्त्वाचे असूनत्त्यावर मोठा भाग अवलंबून आहे़या वर्षी हे धरण वेळेत व पूर्ण क्षमतेने भरले आहे.चासकमानचे पाचही दरवाजे उघडलेचासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे भीमा नदीसह आरळा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्यामुळे चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत.५ वाजता सांडव्याद्वारे ९,१२५ क्युसेक्स वेगाने विसर्ग वाढवून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तर, धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ५७५ व कालव्याद्वारे नदीपात्रात २७५ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विशेषत: सह्याद्रीच्या डोंगररांगावर संततधार सुरू असल्याने चासकमान धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे ८.७५ टीएमसी क्षमता असलेले हे धरण प्रथम २१ जुलै रोजी ९६.९० टक्के भरल्याने ५,२७५ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला होता. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण