मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 19:38 IST2018-04-25T19:14:44+5:302018-04-25T19:38:53+5:30
इंद्रायणी एक्सप्रेसमधून पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिंचवड रेल्वे स्थानकाजवक ही दुर्घटना घडली.

मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
पिंपरी : इंद्रायणी एक्सप्रेसमधून पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिंचवड रेल्वे स्थानकाजवक ही दुर्घटना घडली. अर्जुन रमेश राव असे त्याचे नाव आहे. डोंबिवली येथील रहिवासी असलेला अर्जुन त्याच्या मामाबरोबर सोलापूरला जात होता. मामा रेल्वे डब्यातील आसनावर बसला होता, तर अर्जुन दरवाज्याजवळ उभा असताना तोल जाऊन तो खाली पडला.
मामालाही याबद्दल काही समजले नाही. चिंचवड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना अर्जुन जखमी अवस्थेत आढळून आल्यावर त्याच्या खिशात ओळखपत्र तसेच कुटुंबियांचे मोबाइल क्रमांक सापडले. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या अर्जुनच्या मामालाही याबद्दल माहिती देण्यात आली.
रेल्वे अपघाताची दुसरी घटना
पिंपरी येथे रेल्वे अपघाताची दुसरी घटना घडली. यामध्ये लोहमार्ग ओलांडताना एक्स्प्रेसने उडवल्याने ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. त्याची ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलीस या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचा तपास करत आहे.