शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद कारचालकाने 13 वर्षीय मुलाला चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 16:04 IST

घरासमोर सायकल चालवणाऱ्या 13 वर्षीय मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यपी कारचालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देघरासमोर सायकल चालवणाऱ्या 13 वर्षीय मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यपी कारचालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे.शनिवारी (8 नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास बारामती शहरातील कसबा भागात ही घटना घडली.घटनेनंतर संतप्त नागरिकांनी  तोडफोड केली आहे.

बारामती - घरासमोर सायकल चालवणाऱ्या 13 वर्षीय मुलाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मद्यपी कारचालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (8 नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास बारामती शहरातील कसबा भागात ही घटना घडली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी  तोडफोड केली आहे. तसेच कारमधील तीन मद्यपींना बेदम चोप दिला. शहर पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये पणदरे (ता. बारामती) येथील सराफ व्यावसायिकाचा समावेश आहे.

शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीब गालीब सय्यद (13) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. तर अमीर शौकत सय्यद (35) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार  कारचालक गणेश पोपटराव शहाणे (33), सोमनाथ अनिल लोळगे (33), जितेंद्र गणपतराव भोसले तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये लोळगे सराफ व्यावसायिक आहे. स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच 42/ के 9997) मधील तीन आरोपींनी मद्यपान केले होते. त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या, काचेचे ग्लास सापडले आहेत.साकिब हा शनिवारी रात्री घरासमोर सायकल खेळत होता. यावेळी वडिलांनी त्याला रात्रीचे 10 वाजले आहेत. सायकल लावून घरात ये, असे सांगितले. त्यावर तो घरासमोर येवून सायकल लावत होता. याच वेळी भरधाव वेगावे आलेल्या मद्यधुंद कारचालकाने साकिब  यास अक्षरश: फरपटत नेले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. वेग आवरता न आल्याने साकिब यास फरपटत नेऊन पाचसहा वेळा कार पलटी झाली. 

अपघातानंतर पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे करीत आहेत.घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. कारचालकासह कारमधील अन्य मद्यपींना चोप दिला. तसेच कारची तोडफोड केली. साकिब हा शहरातील राधेश्याम एन. आगरवाल टेक्नीकल हायस्कूलमध्ये इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील  टुरिस्ट कारचालक आहेत. त्याच्या मागे  आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे कसबा, साठेनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

 

टॅग्स :BaramatiबारामतीAccidentअपघातPoliceपोलिस