शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Purushottam Karandak: पुरुषोत्तम करंडकासाठी नव्याने १३ संघांची निवड; एकूण ५१ महाविद्यालये स्पर्धेसाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 12:35 IST

नव्याने दाखल झालेल्या ३३ संघांमधून १३ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड सोमवारी (दि. १५) निश्चित करण्यात आली. नव्याने दाखल झालेल्या ३३ संघांमधून १३ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली आहे.

स्पर्धेचे अर्ज वाटप दि. १४ व १५ जुलै रोजी करण्यात आले. या दोन दिवसांत एकूण ३३ संघांनी अर्ज दाखल केले होते. गेल्यावर्षीच्या स्पर्धेतील ४१ पैकी ३८ संघांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची स्वीकृती दि. ३ व ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात शनिवार पेठेतील नातू वाडा येथे होणार आहे. आतापर्यंत ज्या संघांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी कुणीही या दिवशी गैरहजर राहिल्यास इतर संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली.

स्पर्धेचे वेळापत्रक

दि. ७ ऑगस्ट रोजी लॉटस : स्थळ : इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी

दि. १६ ते ३० ऑगस्ट : पुणे केंद्राची प्राथमिक फेरी

दि. २१ व २२ सप्टेंबर : पुणे केंद्राची अंतिम फेरी

दि. २८ सप्टेंबर : पुणे केंद्राचा पारितोषिक वितरण समारंभ

चिठ्ठीद्वारे निवडलेले महाविद्यालयीन संघ

- एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर- सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग- एन. बी. एन. सिंहगड टेक्निकल इस्टिट्यूट, कॅम्पस आंबेगाव बुद्रुक- इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हिंजवडी- विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, इंदापूर- कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे- डी. वाय. पाटील युनिटेक बी. स्कूल, ताथवडे- नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे- पी. डी. ई. ए. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग- एम. आय. टी. डब्ल्यू. पी. यू., पुणे- अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, लोहगाव- डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी, बी. स्कूल, ताथवडे- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, ऑटोनॉमस, पुणे

टॅग्स :Puneपुणेartकलाcultureसांस्कृतिकcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी