शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात 1200 उद्योग धंदे सुरू ; ५० हजार कामगारांना मिळाला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:55 IST

शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन -तीन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे सुरू

ठळक मुद्देमंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यात अत्यावश्यक सेवा उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय20 एप्रिल नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागातील एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांन परवानगी

पुणे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यासह विभागातील सर्व उद्योग, धंदे एक महिन्यांपासून बंद आहेत. शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन -तीन दिवसांपासून अत्यावश्यक सेवा उद्योग सुरू करण्यास परवानगी देणे सुरू झाले आहे. आता पर्यंत विभागात 1 हजार 149 उद्योग, धंदे सुरू झाले असून, यात पुणे जिल्ह्यात 454 उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गेल्या एक महिन्यांपासून कामधंदा नसलेल्या तब्बल 50 हजार कामगारांच्या हाताला काम मिळाले असल्याची माहिती सहसंचालक (उद्योग) सदाशिव सुरवसे यांनी दिली.महाराष्ट्र आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली.यामुळे गेल्या एक महिन्यांपासून पुणे जिल्हासह विभागातील सर्व उद्योग धंदे बंद आहेत. यामुळे लाखो कामगार, कर्मचारी यांना देखील काही कामधंदा नसून, हातांना काम नसल्याने बेरोजगारांची प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यात अत्यावश्यक सेवा उद्योगांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या, कर्मचारी, कामगारांना पास देणे, माल वाहतुकीस परवानगी आदी सर्व वेळेत पूर्ण करून तातडीने सर्व उद्योग धंदे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत.यामुळे गेल्या दोन दिवसांत विभागामध्ये 1 हजार 149 उद्योग धंद्याना परवानगी देण्यात आली असून, यामध्ये औषधे, ट्रगज् फुड प्रोसेसिंग, अ?ॅग्रीकल्चर प्रोसेसिंग, डिअर प्रॉडक्ट आदी गोष्टींचा समावेश असल्याचे सुरवसे यांनी सांगितले. ----- आता पर्यंत परवानगी देण्यात आलेल्या उद्योगांची व कामगारांची संख्या जिल्हा                उद्योग     कामगार पुणे                       454       15786सातारा                  140       16070सांगली                  327      2662कोल्हापूर             128        5257एकूण                   1149   45728-------- 20 एप्रिल नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागातील एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना देखील परवानगी देण्यात येणार आहेत. यासाठी शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पुणे जिल्हासह विभागातील एमआयडीसी मधील देखील कंपन्या काही अटींवर सुरू करण्याची तयारी सुरू आहे. -सदाशिव सुरवसे ,सहसंचालक (उद्योग)

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMIDCएमआयडीसीState Governmentराज्य सरकार