दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल
By विवेक भुसे | Updated: September 17, 2023 12:28 IST2023-09-17T12:08:01+5:302023-09-17T12:28:17+5:30
हा अपघात दिवे घाटातून पुण्याकडे येताना दुसर्या वळणावर सकाळी साडेआठ वाजता घडला.

दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी; सर्वांना सासवड येथील रुग्णालयात केले दाखल
पुणे : स्लॅब टाकण्याचे साहित्य घेऊन पुण्याकडे येत असताना दिवे घाटात एक टेम्पो उलटल्याने त्यातील १२ कामगार जखमी झाले. हा अपघात दिवे घाटातून पुण्याकडे येताना दुसर्या वळणावर सकाळी साडेआठ वाजता घडला.
याबाबत अग्निशामन दलाचे अधिकारी गायकवाड यांनी सांगितले की, आर सी सी स्लॅब टाकण्यासाठी लागणारे साहित्य व कामगारांना घेऊन टेम्पो सासवडहून पुण्याकडे येत होता. दिवे घाटातील दुसर्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला. त्यातील सर्व साहित्य आतील कामगारांच्या अंगावर पडले.
घाटातून जाणार्या नागरिकांनी तिकडे धाव घेत हे साहित्य बाजूला करुन आतील कामगारांना तातडीने मिळेल, त्या गाडीने सासवड येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. अग्निशमन दलाची गाडी पोहचण्यापूर्वी नागरिकांनी टेम्पोत अडकलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढले होते. या अपघातात १२ कामगार किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.