शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

12 th Exam : बारावीच्या परीक्षेचा ताण; विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:23 IST

पुणे : बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने नऱ्हे परिसरातील जाधवर कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. आयुष जाधव ...

पुणे: बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने नऱ्हे परिसरातील जाधवर कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. आयुष जाधव (वय: १८, रा. वडगाव) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला तणावामुळे आयुषने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  बारावी परीक्षेच्या सकाळच्या सत्रातील इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला एका विद्यार्थ्याने परीक्षेचा तणाव घेत टोकाचे पाऊल उचलले आहे.    राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जात आहेत.  दरम्यान,  यंदा राज्यातील १०,५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून ३,३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे.  परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले. वेळेत पोहोचण्यासाठी पालकांची धडपड, शेवटच्या क्षणी अभ्यासाची घाई आणि परीक्षेच्या निकालाबाबतची धाकधूक अशा विविध भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होत्या.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणhospitalहॉस्पिटल