पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी; ६ जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 07:15 IST2021-10-31T07:14:40+5:302021-10-31T07:15:07+5:30

ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

12 injured after slab of under construction building collapses in Pune | पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी; ६ जणांची प्रकृती गंभीर

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी; ६ जणांची प्रकृती गंभीर

पुणे: निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जण जखमी झाल्याची घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. बालेवाडीमधील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब इमारतीचा कोसळला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी १२ जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. जखमी झालेल्या १२ जणांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: 12 injured after slab of under construction building collapses in Pune