शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 10:11 IST

दुसऱ्या फेरीत ४० हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात अकरावी प्रवेशाची तिसरी प्रवेश फेरी आज, गुरुवार (दि. १८)पासून सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीत बुधवार सायंकाळपर्यंत केंद्रीय प्रवेशांद्वारे एकूण ३३ हजार २६०, तर राखीव जागांसह मिळून ४० हजार २३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी २२ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठीची मुदत बुधवारी संपली. आजपासून तिसरी फेरी सुरू करण्यात येणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ३०६ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी १ लाख ४ हजार ४८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे, तर २३ हजार ४०० जागा राखीव काेट्यातून भरल्या जाणार आहेत. यापैकी पहिल्या फेरीत २५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या फेरीत १७ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता.तिसऱ्या फेरीच्या वेळापत्रकानुसार १८ आणि १९ ऑगस्ट दरम्यान नवीन अर्ज नोंदणी करता येईल. तसेच, प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. विद्यार्थ्यांना १८ ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल. तसेच २२ ऑगस्टला तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे प्रवेश जाहीर करण्यात येणार आहेत.

नऊ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ

दुसऱ्या फेरीत जवळपास नऊ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे, तर २४ ऑगस्टला कनिष्ठ महाविद्यालयांना कोट्यातील जागा समर्पित करता येतील, तर २५ ऑगस्टपासून पुढील फेरीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या कालावधीत राखीव जागांवरील (कोटा) प्रवेश प्रक्रिया, द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीProfessorप्राध्यापकSocialसामाजिक