शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

अबब!पुण्यात विना हेल्मेटच्या १७ लाख ५ हजार ९१५ कारवाया; पुणेकरांना एकूण १११ कोटी रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 18:44 IST

पोलिसांनी २०१९ मध्ये प्राणघातक अपघाताची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा केला निर्धार..

ठळक मुद्दे२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये प्राणांतिक अपघातांमध्ये १७.०८ टक्क्यांनी घटगतवर्षी ५२ कोटी रुपयांचा दंड

पुणे : शहरातील वाहतूक नियोजनाऐवजी वाहतूक पोलिसांचा दंड करण्यावर भर असतो, अशी टिका केली जाते. वाहतूक पोलिसांना टारगेट ठरवून दिले जाते, असे सांगित जाते. याचा प्रत्यय वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत दिसून आला आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी तब्बल २७ लाख ५९ हजार २२९ वाहनांवर कारवाई केली असून त्यांच्यावर तब्बल १११ कोटी ७४ लाख ३३ हजार ५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे.

गतवर्षी ५२ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता. त्याच्या दुप्पटीहून अधिक दंड यंदा करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी २०१९ मध्ये प्राणघातक अपघाताची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी अन्य कोणत्याही सोयीसुविधांचा विचार न करता हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यातून शहरात मोठ्या प्रमाणावर निषेधही करण्यात आला होता.पण, त्याकडे दुर्लक्ष करुन पोलिसांनी हेल्मेटसक्ती कडकपणे राबविण्यास सुरुवात केली़ चौकाचौकात पोलीस एखाद्या टोळीप्रमाणे उभे राहून विना हेल्मेटधारक वाहनचालकाला अक्षरश वाहत्या रस्त्यावरुन पकडून आणत असत. त्यातूनच लोकप्रतिनिधींनी त्याच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. त्यानंतर चौका चौकात उभे राहणारे हे वाहतूक पोलीस गायब झाले. त्याऐवजी सीसीटीव्हीमार्फत कारवाया केल्या जाऊ लागल्या. वाहतूक शाखेचे २४ विभाग आणि सीसीटीव्ही द्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. २०१९ च्या वर्षभरात तब्बल १७ लाख ५ हजार ९१५ विना हेल्मेटच्या प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश दंड हा वसुल होऊ शकलेला नाही. ज्या प्रमाणात हा दंड करण्यात आला आहे़ ते पाहता त्याप्रमाणात पुणे शहरातील हेल्मेट घालणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही. तसेच वाहतूकीतही सुधारणा झालेली नाही.  २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये प्राणांतिक अपघातांमध्ये १७.०८ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, हे प्राणांतिक अपघात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नाही तर वाहतूक कोंडीत झालेली वाढ, मेट्रोची सुरु असलेली कामे व त्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे़.

.........

वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ केलेली दंडात्मक कारवाईनियमभंग        केसेसनो पार्किंग        ३२३०७४विना लायसन्स        २०७१९मोबाईल टॉकिंग        १९२९९झेब्रा क्रॉसिंग                                      ५९९३१विना हेल्मेट                                    १७०५९१५नो एन्ट्री                                          ३५१०६रॅश ड्रायव्हिंग                                 १२०२६ट्रिपलसिट                                      १६८००लायसन्स जवळ न बाळगणे         ११९७८९रॉग साईड ड्रायव्हिंग 

इतर                                            ३९८७०८़़़़़़़़़़़एकूण                                            २७५९२२९

 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर