पिंपरी-चिंचवड शहरातील ११ सहायक पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीने बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 22:46 IST2022-02-02T22:45:06+5:302022-02-02T22:46:14+5:30
राज्य पोलीस दलातील ४५३ सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदाेन्नती देत बदली करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील ११ सहायक पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीने बदली
लेाकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी:राज्य पोलीस दलातील ४५३ सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदाेन्नती देत बदली करण्यात आली. यात पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ११ जणांचा समावेश आहे. याबाबत प्रशासनाकडून बुधवारी (दि. २) आदेश जारी करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातून दीपाली बाळासाहेब मोटे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), गजानन महादेव बनसोडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), गोकुळ रामदास महाजन (नागपूर शहर) यांची तर गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे सुरेखा मोतीराम चव्हाण, स्वाती रामनाथ खेडकर, अविनाश एकनाथ पवार यांची तसेच मुंबई शहर येथे राजू रामचंद्र ठुबल, सुनील वसंत बिले, विनोद बिभिषण शिंदे, विजय गरुड, शाहिद सय्यद पठाण यांची पदोन्नतीने बदली झाली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस निरीक्षकांच्या मंजूर पदांपेक्षा जास्तीचे निरीक्षक सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे निरीक्षक दर्जाचे काही अधिकारी अतिरिक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात अडचणी येत आहेत.