शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

दहावी उत्तीर्णही होणार उपकुलसचिव !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 2:29 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ठरविले पदोन्नतीचे नवे नियम

- दीपक जाधव पुणे : देशात शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध पदांसाठीच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये वाढ होत आहे. बहुसंख्य अधिकारी पदांसाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दहावी उत्तीर्णांनाही पदोन्नतीने उपकुलसचिव बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात दहावी पास शिपाई आणि दहावी पास उपकुलसचिव एकत्र काम करताना दिसतील.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कनिष्ठ सहायक ते उपकुलसचिव पदी पदोन्नती होण्यासाठीची नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये प्रत्येक पदाच्या पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व अनुभव यांचे नियम त्यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार दहावी उत्तीर्ण होऊन कनिष्ठ सहायक म्हणून विद्यापीठात रुजू झाल्यास अवघ्या १८ वर्षांच्या सेवेनंतर तो उपकुलसचिव बनू शकणार आहे.कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, सहायक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी, सहायक कुलसचिव, उपकुलसचिव, स्वीय सहायक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षारक्षक, शिपाई, दफ्तरी आदी पदांच्या पदोन्नतीची नियमावली जाहीर केली आहे. ही सर्व पदे दोन पद्धतींनी भरली जातात. एक सरळ सेवा व दुसरी विभागीय पदोन्नती. नव्या नियमावलीनुसार ५० टक्के पदे सरळ सेवा प्रवेशाने, तर ५० टक्के पदे विभागीय पदोन्नतीने भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.इतर विद्यापीठांमध्ये वयाची अटराज्यातील इतर काही सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पदोन्नतीसाठी विशिष्ट वयाची अट घालण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथे दहावी उत्तीर्ण व्यक्तींना उपकुलसचिव पदापर्यंत पोहोचता येत नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मात्र वयाची अट घालण्यात न आल्याने इथे दहावी उत्तीर्णांना उपकुलसचिव होता येईल.विद्यापीठ प्रशासनाचे मौनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्याशी दूरध्वनी व मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.दहावी उत्तीर्ण असलेला कनिष्ठ सहायक ३ वर्षांच्या अनुभवानंतर वरिष्ठ सहायक बनू शकणार आहे. त्यानंतर पुन्हा ३-३ वर्षांच्या सेवेनंतर सहायक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी, सहायक कुलसचिव अखेर उपकुलसचिव तो बनू शकेल. केवळ सहायक मागील ५ वर्षांचा वार्षिक गोपनीय अहवाल समाधानकारक, संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र, मागासवर्गीयांसाठी जातवैधता प्रमाणपत्र, मालमत्ता व दायित्वे यांचे वार्षिक विवरण एवढी कागदपत्रे सादर केल्यास दहावी उत्तीर्ण कर्मचाऱ्याला उपकुलसचिव बनण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पदोन्नतीच्या या नव्या नियमावलीमध्ये केवळ दहावी उत्तीर्ण कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, पदव्युत्तर शिक्षण घेऊन एमफिल, पीएचडी झालेल्या कर्मचाºयांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. या नव्या नियमावलीमुळे आमच्या या पदव्यांचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.पदोन्नतीच्या नव्या नियमावलीची पडताळणीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी जाहीर केलेल्या पदोन्नतीच्या नव्या नियमावलीची पडताळणी केली जाईल. शासकीय कायदे व नियमांच्या चौकटीत ही नियमावली बसते का, याची तपासणी केली जाईल. - धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण विभाग

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठ