शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 20:33 IST

किती वर्षे पक्षात आहात, राजकीय, सामाजिक कामांची पार्श्वभूमी, आतापर्यंत किती निवडणूका लढवल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुलाखतींमध्ये माहिती विचारण्यात आली..

ठळक मुद्देमुलाखती पुर्ण : आमदारांसह नगरसेवकांचीही तयारीशहरातील सर्वच म्हणजे आठही मतदारसंघामध्ये भाजपाचेच आमदार

पुणे : भारतीय जनता पाटीर्चे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे निरीक्षक आशिष शेलार यांनी पुणे शहरातील विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. ८ मतदारसंघांसाठी १०३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यात विद्यमान आमदारांसह अनेक नगरसेवकांचा तसेच पक्षात नुकताच प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे. पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात दुपारी १२ वाजता मुलाखतींना सुरूवात झाली. समर्थक कार्यकर्त्यांसह इच्छुक या मुलाखतींना उपस्थित होते. त्यामुळे पक्ष कार्यालय गजबजून गेले होते. शेलार यांनी सुरूवातीलाच मुलाखती आपण एकटेच घेणार आहोत असे स्पष्ट केले. त्यामुळे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट हे कार्यालयातच दुसऱ्या ºया खोलीत बसले होते. मतदारसंघानुसार इच्छुकांना बोलावून एकाच वेळी त्यांना प्रश्न विचारत या मुलाखती झाल्या. वैयक्तिपणे शेलार भेटतील व माहिती घेतील अशी इच्छुकांची अपेक्षा होती. किती वर्षे पक्षात आहात, राजकीय, सामाजिक कामांची पार्श्वभूमी, आतापर्यंत किती निवडणूका लढवल्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मुलाखतींमध्ये माहिती विचारण्यात आली असे इच्छुक उमेदवारांबरोबर संपर्क साधला असता समजले. शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सर्वात कमी म्हणजे ४  इच्छुक पर्वती मतदारसंघात होते. शहरातील सर्वच म्हणजे आठही मतदारसंघामध्ये भाजपाचेच आमदार आहेत. त्या सर्वांनीच आपापल्या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखती दिल्या. त्यांच्याबरोबरच त्यात्या मतदारसंघातील नगरसेवक, पक्षाचे संघटनात्मक पदाधिकारी यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.मुलाखतीनंतर तुमच्याबरोबर शहराध्यक्ष बोलतील असे सांगत आशिष शेलार माध्यम प्रतिनिधींबरोबर न बोलताच निघून गेले. मिसाळ यांनी सर्व मुलाखती शांततेत पार पडल्या असल्याचे सांगितले. आमदारांशिवाय अन्य जणेही मुलाखत देतात याचा अर्थच पक्षात लोकशाही आहे असे त्या म्हणाल्या, तुमच्या मतदारसंघात सर्वाधिक कमी इच्छुक आहेत असे लक्षात आणून दिल्यानंतर याचा अर्थ माझे काम चांगले आहे असे उत्तर त्यांनी दिले. खासदार बापट म्हणाले, पक्षसंघटनेत अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे असेच ही गर्दी सांगत आहेत. या मुलाखतींचा अहवाल शेलार प्रदेश शाखेकडे देतील. त्यानंतर तो निवड समितीकडे जाऊन केंद्रीय समिती त्यावर निर्णय करेल असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाElectionनिवडणूकAshish Shelarआशीष शेलार