पीएमपीच्या ताफ्यात येणार नवीन १ हजार सीएनजी बस
By नितीन चौधरी | Updated: February 8, 2025 15:24 IST2025-02-08T15:23:41+5:302025-02-08T15:24:30+5:30
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या बससेवा एकत्रित केलेल्या पीएमपीएमएलच्या ताफ्यातील बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन १ ...

पीएमपीच्या ताफ्यात येणार नवीन १ हजार सीएनजी बस
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या बससेवा एकत्रित केलेल्या पीएमपीएमएलच्या ताफ्यातील बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन १ हजार बस घेण्याचे ठरले असून, यासाठी पीएमआरडीएकडून २५० कोटी, तर दोन्ही महापालिकांचे मिळून २५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी यांनी दिली. इलेक्ट्रिक बस येण्यास उशीर होत असल्याने या बस सीएनजीवरीलच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, “पीएमपीच्या ताफ्यातील बस जुन्या झाल्या आहेत. बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे एक हजार नवीन बस घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यामध्ये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) २५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उर्वरित अडीचशे कोटी रुपयांचा भार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका उचलणार आहे. यात पुणे महापालिका १५० कोटी रुपये, तर पिंपरी-चिंचवड महापालिका १०० कोटी रुपये निधी देणार आहे. यात काही बस सीएनजीवरील, तर काही बस इलेक्ट्रिक असाव्यात असा विचार होता; परंतु इलेक्ट्रिक बसचे देशात उत्पादन कमी आहे. त्यामुळे त्या येण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे टाटा कंपनीच्या सीएनजीवरील बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”