शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मॉडेल, फॅशन डिझायनरचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याच्या आमिषाने 100 जणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 12:35 IST

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

- किरण शिंदे 

पुणे : फेसबुक इंस्टाग्रामद्वारे जाहिरात करून मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल, फॅशन डिझायनर याचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याचे आमिष दाखवत जवळपास 100 जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. मार्च 2022 ते मे 2023 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा, जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे आणि अनिरुद्ध बिपिन रासने अशी पुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पल्लवी प्रशांत सुगंधव (वय 33) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात आतापर्यंत 23 जणांनी अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्यास संदर्भात तक्रार दिली आहे. आरोपींकडून अशाप्रकारे जवळपास 100 जणांची फसवणूक झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपींनी क्लिक ऍंड ब्रश या नावाने कंपनी स्थापन केली. कोथरूडच्या भुसारी कॉलनी या कंपनीचे कार्यालय होते. आरोपींनी फेसबुक आणि सोशल मीडिया द्वारे जाहिरात केली. मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल, फॅशन डिझायनर याचे प्रशिक्षण देऊन काम मिळून देण्याचे आमिष त्यांनी दाखवले.

यासाठी त्यांनी अंदाजे 100 जणांना तीन महिने आणि दोन वर्षाचे सबस्क्रीप्शन घेण्यास भाग पाडले. सबस्क्रीप्शनचे पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कंपनी अडचणीत असून काम बंद केल्याचे सांगून फसवणूक केली. आतापर्यंत आरोपींनी एकूण 43 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी