शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

लग्नाचे आमिष दाखवून १० लाख उकळले; मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:57 IST

तरुणाने लग्न झाले असतानाही विवाहाच्या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली, नंतर तरुणीला फसवून १० लाख उकळले

पुणे: पहिले लग्न झाले असतानाही लग्न जमवणाऱ्या वेबसाईटवर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले. काही दिवसांनंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून, पत्नी गर्भवती आहे असे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोपट बाबूराव फडतरे (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कुलदीप आदिनाथ सावंत (३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती. पल्लवी पोपट फडतरे (२५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी कुलदीप सावंत याने लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे भासवून नोंदणी केली. फिर्यादी यांना तो देहू येथे समक्ष जाऊन भेटला. फिर्यादी यांना त्याचे वागणे व आरोपीचा दवाखाना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदीपला नकार कळवला होता. असे असताना फिर्यादींच्या अपरोक्ष त्याने त्यांची मुलगी पल्लवीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखवले. पल्लवी ही बीएमएसएच झाली असून, तिचे क्लिनिक आहे. कुलदीपने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करत, तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिने लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून, आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला.तिने त्याच्याकडे १० लाख रुपये परत करण्याची मागणी केली. परंतु, तो टाळाटाळ करू लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेतले. ही बाब समजल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना ८ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी कुलदीप याच्यावर विश्वासघात, फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूmarriageलग्नSocialसामाजिक