शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

Pune Porsche Accident: पोर्शे अपघाताला १ वर्ष पूर्ण; बड्या बापासहीत ९ आरोपी जेलमध्येच, वर्षभरात नेमकं काय घडलं?

By नितीश गोवंडे | Updated: May 19, 2025 14:03 IST

मुलाची आई शिवानी अगरवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिमजामीन देण्यात आला तरी रद्द करण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे

नितीश गोवंडे

पुणे: कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणाला रविवारी (दि. १८) एक वर्ष पूर्ण झाले. बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवत दुचाकीस्वार दोघांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात संगणक अभियंता असलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेनंतर पुणेपोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या अपघाताची माहिती वरिष्ठांना न देणे, एका तत्कालीन स्थानिक आमदाराची पोलिस ठाण्यात लुडबुड, अल्पवयीन मुलाची पोलीस ठाण्यात पिझ्झा पार्टी. मात्र, वरिष्ठांना या घटनेची माहिती होताच या प्रकरणी पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दहा जणांना अटक केली होती. त्यातील नऊ आरोपी आजही जेलमध्ये आहेत. या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा श्रीमंत बाप आणि आजोबा यांचादेखील समावेश आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे हे काम करीत आहेत.

ही टोळी अजूनही जेलमध्ये..

गेल्या वर्षभरापासून पोलिसांनी केलेल्या अत्यंत प्रभावी तपासामुळे व न्यायालयात योग्य बाजू मांडल्यामुळे विशाल अगरवाल, सुरेंद्र अगरवाल, अश्पाक मकानदार, आशिष मित्तल, अमर गायकवाड, आदित्य सूद, अरुणकुमार सिंग यांच्यासह ससूनचे श्रीहरी हाळनोर, अजय तावरे आणि अतुल घटकांबळे ही मुलाला वाचवण्यासाठी काम करणारी टोळी अजूनही जेलमध्येच आहे. शिवानी अगरवाल हिला २३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन देण्यात आला. हा जामीन देखील रद्द करण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला असून, त्यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे.

वर्षभरात नेमके काय झाले यावर एक नजर..

१९ मे - भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू २० मे - मद्यपान करून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मुलाला बाल न्याय मंडळाकडून जामीन२१ मे - विशाल अगरवाल, नमन भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नीतेश शेवानी आणि जयेश गावकर यांना अटक२२ मे - अल्पवयीन आरोपीची पाच जूनपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी२४ मे - मुलाचे वडील असलेल्या बांधकाम व्यावसायिकासह पब चालक व कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी२४ मे - तपासात दिरंगाई केल्याबद्दल येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी निलंबित२५ मे - तपास गुन्हे शाखेकडे वर्ग२५ मे - बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अगरवाल यांच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा२५ मे - चालकाला धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक२६ मे - चालकाला धमकावल्याप्रकरणी विशाल अगरवाल यांना अटक२७ मे - विशाल अग्रवाल, कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज२७ मे - डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना अटक२८ मे - चालकाला धमकावले म्हणून विशाल व सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी३० मे - रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेतले असल्याची पोलिसांची न्यायालयात माहिती१ जून - विशाल अगरवालसह पब मालकांच्या जामिनाबाबत पोलिसांचे म्हणणे सादर१ जून - रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल व शिवानी विशाल अग्रवाल यांनी अटक२ जून - शिवानी आणि विशाल अगरवाल यांना पाच जूनपर्यंत पोलिस कोठडी२ जून - डॉ. तावरेसह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ४ जून - रक्ताच्या नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी अश्पाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड यांना अटक५ जून - मुलाऐवजी आईचेच रक्त घेतल्याचे डीएनए अहवालातून स्पष्ट झाले५ जून - बांधकाम व्यावसायिक, कोझीचे मालक व ब्लॅक पबच्या कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी५ जून - अग्रवाल पती-पत्नीला दहा, तर डॉक्टरांना सात जूनपर्यंत पोलिस कोठडी५ जून - मुलाचा बाल सुधार मुक्काम १२ जूनपर्यंत वाढविण्यात आला१२ जून - अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी१२ जून - मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढला१५ जून - मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या मंडळाकडून पुष्कळ चुका राहिल्याचा चौकशी समितीचा अहवाल सादर२५ जून - अल्पवयीन युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर१ ऑगस्ट - अगरवाल दाम्पत्य, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, मकानदार, घटकांबळे विरोधात ९०० पानी दोषारोपपत्र दाखल१५ नोव्हेंबर - सूद, मित्तल विरोधात २४२ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल१० जानेवारी - सिंग विरोधात ४७७ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल२३ एप्रिल २०२५ - शिवानी अगरवाल हिला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय