शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने चोरले १ लाख रुपये, चोरट्यांचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 14:46 IST

चोरीच्या विविध घटनांमध्ये अनेक नवनवीन फंडे वापरले जातात. असाच काहीसा प्रकार एका जोडप्यासोबत पहाटे साडेपाच वाजता घडला आणि त्यांच्याकडचे तब्ब्ल एक लाख रुपये लंपास केले.

पुणे : पैसे असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडची रोकड चोरुन नेण्याचे फंडे अवलंबले जातात़. आता त्यांनी एक नवाच फंडा काढला़ चक्क लिफ्ट देण्याचा बहाणा करुन एका जोडप्याचे तब्बल एक लाख रुपये चोरुन नेण्याचा प्रकार रविवारी घडला़.याप्रकरणी तुळशीराम वावळकर (वय ५९, रा़ कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तुळशीराम वावळकर हे आपल्या पत्नीसह कात्रज येथे जाण्याकरीता शिवाजीनगर येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोरील बसस्टॉपवर पहाटे साडेपाच वाजता उभे होते़. यावेळी पांढऱ्या रंगाची मोटार आली़ गाडीत बसलेल्याने कुठे जायचे आहे, असे विचारले़. तेव्हा त्यांनी कात्रज आंबेगाव येथे जायचे असल्याचे सांगितले़. तेव्हा गाडीत माणसाने प्रत्येकी वीस रुपये द्यावे लागतील, असे सांगितले़. त्यानुसार दोघेही जण गाडीत बसले़ तेव्हा मोटारचालकाने त्यांच्या हातातील काळ्या व लाल रंगाची बॅग पाठीमागे बसलेल्या माणसाकडे दिली़. त्या बॅगेत एक लाख रुपये होते़. काही अंतर गेल्यावर चालकाने गाडी थांबवली व मला फोन आला आहे़ मला परत जावे लागेल़, मी पुढे येणार नाही़ तुम्ही येथेच उतरा असे म्हणाला़. त्यानुसार दोघेही खाली उतरले़ मागे बसलेल्याने त्यांची बॅग गाडीच्या खिडकीतून खाली फेकली़ ती बॅग उचलेपर्यंत गाडी निघून गेली़. त्यांना संशय आल्याने त्यांनी बॅग उघडून पाहिली असता बॅगेत ठेवलेली १ लाख रुपयांची रक्कम दिसून आली नाही़. त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिसांकडे धाव घेतली़. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ .अशाप्रकारे लिफ्टचा बहाणा करुन पैसे चोरण्याचा ही पहिलीच घटना आहे़. रविवारी इतक्या सकाळी ही घटना घडली असल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून अथवा तक्रारदाराने बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यांचा पाठलाग करुन हा गुन्हा केल्याचेही दिसत नसल्याने पोलीसही काहीसे चक्रावून गेले आहेत़. 

 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसMONEYपैसा