'दहा हजार किलोची मिसळ', सोबत १ लाख नागिरकांनी घेतला ताकाचा आस्वाद

By अजित घस्ते | Published: April 14, 2024 05:51 PM2024-04-14T17:51:25+5:302024-04-14T17:51:54+5:30

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक तयार केले

1 lakh citizens tasted buttermilk along with Ten Thousand Kilo Misal | 'दहा हजार किलोची मिसळ', सोबत १ लाख नागिरकांनी घेतला ताकाचा आस्वाद

'दहा हजार किलोची मिसळ', सोबत १ लाख नागिरकांनी घेतला ताकाचा आस्वाद

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली याप्रेरणेतून ड़ॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने पुणे स्टेशन येथे रविवारी तब्बल १ लाख नागरिकांकरिता ताक तयार करण्यात आले तर 'दहा हजार किलोची मिसळ' मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा तब्बल २५०० किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये मिसळ व त्यापेक्षा लहान कढईमध्ये ताक तयार करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांसह सहका-यांनी ही मिसळ व ताक बनवले.

यावेळी विविध क्षेत्रातील राजकीय पक्ष, संघटनेतील पदाधिकारी मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळ सोबत ताकाचा आस्वादही घेतला. यावेळी महेंद्र मारणे, विलास कसबे, संतोष पंडीत, बाळासाहेब रुणवाल, एकनाथ ढोले, संदेश काथवटे, सचिन विप्र, रवि गुडमेटी, राम तोरकडी, शेखर काळे, रुपेश चांदेकर, श्रीधर चव्हाण, प्रल्हाद गवळी, यशोदीप सोनवणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला.

असे बनवली मिसळ व ताक

याउपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी एक हजार किलो मटकी, किलो, ८०० किलो कांदा, २०० किलो आद्रक, लसून तर ७०० किलो तेल, १४० किलो मिसळ मसाला. ४० किलो लाल मिरची पावडर, हळद पावडर, तर ५० किलो मीठ तसेच अडीज हजार किलो फरसाण, तर १० हजार लिटर पाणी. १२५ जुडी कोथिंबीर व एक हजार लिंहू लिंबू इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच ताकासाठी १ हजार किलो दही वापरण्यात आले.

Web Title: 1 lakh citizens tasted buttermilk along with Ten Thousand Kilo Misal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.