शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नोकरीच्या आमिषाने १९ जणांची १ कोटी १४ लाखांची फसवणुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 11:36 IST

संस्थाचालक, एजंट, राजकीय नेते यांचे साटेलोटे :

ठळक मुद्देएजंटातील पैशाच्या देण्याघेण्यावरुन एकाने दुसऱ्याचे अपहरण केल्याने हा प्रकार समोर

पुणे : आश्रमशाळेत अधीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने १९ जणांची तब्बल १ कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. त्यात संस्थाचालक, राजकीय नेते आणि एजंटयांच्या साटेलोटातून तरुणांची संगनमतांनी फसवणूक केली आहे़. एजंटातील पैशाच्या देण्याघेण्यावरुन एकाने दुसऱ्याचे अपहरण केल्याने हा प्रकार समोर आला आहे़. त्यात फसवणूक झालेले बहुतांश तरुण हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेयेथील राहणारे आहेत़.याबाबतची माहिती अशी, विजय श्रीपती पाटील (रा़ नांदेड सिटी) याने संस्थाचालकांच्या मदतीने अकोले तालुक्यातील तरुणांना नोकरीचे आमिष दाखवूनदीड वर्षांपासून १९ तरुणांकडून १ कोटी १४ लाख रुपये घेतले़. रायगड, आळंदी,अहमदनगर येथील संस्थाचालकांशी संगनमत करुन यातील काही जणांना संस्थेच्या लेटरहेडवर नोकरी दिल्याचे पत्रही दिले़. काही जणांनी या संस्थांमध्ये ४ ते ५ महिने नोकरीही केली़. मात्र, त्यांना त्याचा कोणताही पगार दिला नाही़.तसेच त्यांना त्यानंतर कामावरुन काढून टाकले़. आपली फसवणूक झाल्याचे यातरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विजय पाटील याच्याकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली़. त्यासाठी काहींनी घरात नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगितले़. तेव्हा त्याने या तरुणांना जवळपास १५ लाख रुपये परतही केले़.याबाबत विजय पाटील व जगन्नाथ माने यांच्यातील पैशांच्या देवाण घेवाणीतूनवाद निर्माण झाला़. माने पाटील याच्याकडे ३० लाखांची मागणी करीत होता़ . तेव्हा पाटील याने त्याला पोस्ट डेटेड चेक दिले़. परंतु, ते वटले नाही़ त्यामुळे माने व त्याचे साथीदार गेल्या शनिवारी पाटील याच्या नांदेड सिटी येथे गेले व त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले़ .त्यांनी चार दिवस पाटील याला डांबून ठेवले होते़. त्याच्या पत्नीने ही बाब पोलिसांना सांगितल्यावर पाटील याची मंगळवारी सायंकाळी सुटका झाली़. याबाबत विजय पाटील याने आपण या तरुणांकडून १ कोटी १४ लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेतल्याचे मान्य करुन सांगितले की, यातील जवळपास ६९ लाख रुपये आपण रायगड, आळंदी येथील संस्थाचालकांना या तरुणांना नोकरीलावण्यासाठी दिले आहे़ अहमदनगरमधील एका राजकीय पक्षाच्या नेत्याला १४ लाख ७० हजार रुपये दिले असून त्याचा आपल्याकडे हिशोब आहे़. याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले की, आरोपी जरी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असला तरी त्याचेव्यवहार हे त्यांनी त्यांच्या गावातून तसेचपुणे शहरातील एका हॉटेलमध्येपैसे दिले आहेत़. त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली तर आम्ही तक्रार घेऊ़.़़़़नोकरी मिळाल्यामुळेच आमच्या त्यांच्याशी संपर्क झाला...

याबाबत तरुणांनी ' लोकमत 'ला सांगितले की, आमच्या तालुक्यातील दोघा जणांनारायगडमधील एका संस्थेत पैसे दिल्यानंतर नोकरी मिळाली होती़ त्यातून आमचाविजय पाटील याच्याशी संपर्क झाला़ आणखी एका तरुणाने सांगितले की,नोकरीसाठी १५ गुंठे जमीन विकून मी पैसे दिले आहेत़ काहींनी घरावर कर्जकाढून नोकरीसाठी विजय पाटील याला पैसे दिले होते़. एका बाजूला नोकरी मिळाली नाही तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते थकल्याने घरावर जप्ती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे़. गेले दोन तीन दिवस हे तरुण पुण्यात फिरत आहेत़.

..............

पैशासाठी विजय पाटीलच्या घरात मुक्काम

विजय पाटील याच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी या तरुणांची आई व नातेवाईक अशा चार महिला दोन दिवसांपूर्वी नांदेड सिटीमध्ये गेल्या होत्या़. तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना दरवाज्यात अडविल्यावर विजय पाटील यांची पत्नी तेथे आली़.  या महिलांना आपल्याबरोबर घरी घेऊन गेल्या होत्या़. या महिलापैसे वसुलीसाठी दोन दिवस त्यांच्या घरात राहिल्या होत्या़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस