शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा आवाज जनतेपर्यंत खरंच पोहोचत नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 04:59 IST

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हवरून टोला; राज्यपालांचा मान राखावा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय; पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हमधील विधानाची आठवण करून देत, ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत खरंच पोहोचत नाही, हेच आम्ही सव्वावर्षापासून सांगत आहोत, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत हाणला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल केला. राज्यात कोरोना वाढत असताना सरकार मात्र केवळ फेसबुक लाइव्हमध्ये मग्न होते. कोरोना उपाययोजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. अमरावतीत कोरोनाचे खोटे अहवाल दिले जात आहेत. अव्वाच्या सव्वा दराने खरेदी, वस्तू भाड्याने घेण्याचे प्रकार घडले. १,२०० रुपये किमतीचे थर्मामीटर ६,५०० रुपयांत घेण्यात आले. दोन लाख रुपये खर्चून खरेदी करता येण्याजोग्या चादरींसाठी साडेआठ लाख रुपये खर्च केले, असा आरोप त्यांनी केला. राज्यपालांनी अभिभाषणातून मांडलेले मुद्दे ही पोकळ माहिती आहे. यमक जुळवणारी भाषा ही यशाचे गमक होऊ शकत नाही. केवळ शब्दांनी लोककल्याण साधता येत नाही, असे ते म्हणाले. 

राज्यपाल व्यक्ती नव्हे तर  व्यवस्था असते आणि त्यांचा मान राखला जाणे अपेक्षित असते; परंतु त्यांना विमान नाकारणे अधिकच गंभीर होते. इतका कोतेपणा सरकारने कधीही दाखविला नाही, अशी टीका त्यांनी केली. कोरोनाचा प्रश्न नीट हाताळला असता तर किमान ३० हजार मृत्यू टाळता आले असते. आता लसीकरणाचा गोंधळ सुरू आहे. शिवजयंती अन् मंदिरे उघडी ठेवल्यानेच कोरोना वाढतो, हा अजब तर्क असल्याचे ते म्हणाले. 

देशभक्तीच्या ट्वीटचा अभिमानभारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी टूलकिटवाल्यांना प्रत्युत्तरात देशभक्तीचे ट्वीट केले, त्यात काय गुन्हा केला?  सरकार त्यांची चौकशी करणार हे दुर्दैवी आहे, असे फडणवीस यांनी म्हणताच आम्ही त्यांची नाही तर भाजपच्या आयटी सेलची चौकशी करीत आहोत, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. तेव्हा, देशभक्तीचे ट्वीट करण्यामागे भाजप आहे तर मग मला त्याचा अभिमान आहे, तुमच्या चौकशांना आम्ही घाबरत नाही, असे फडणवीस यांनी सुनावले.

मंत्री टेंडर ठरवतात म्हणून कुलगुरूंचे राजीनामेखात्याचे मंत्रीच विद्यापीठांतील कामांचे कंत्राट ठरवायला लागले आहेत. आपल्या कार्यक्रमांसाठी ते विद्यापीठांना वेठीस धरत आहेत. दबावापायी दोन कुलगुरूंनी राजीनामे दिले, असा आरोप फडणवीस यांनी केला.

पूजा चव्हाणप्रकरणी निलंबनाची मागणीपूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी एफआयआर न नोंदविणाऱ्या वानवडी; पुणे ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना तत्काळ निलंबित करा. १२ ऑडिओ क्लिप आहेत, थेट पुरावे आहेत मग आणखी काय पाहिजे, गुन्हा का नोंदवत नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे