शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

"पंतप्रधान आम्हाला घाबरतात, हे त्यांना शोभत नाही"; आंदोलनजीवीवरुन योगेंद्र यादवांनी सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 9:03 AM

Yogendra Yadav And Narendra Modi : योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे. राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनातील नेते योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. योगेंद्र यादव यांनी एका फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना "पंतप्रधान मोदी स्वत: काही दिवसांपूर्वी जनआंदोलनाबाबत बोलत होते. काँग्रेस विरोधात ते जनआंदोलन करण्याची भाषा करत होते. मात्र आता त्यांना आंदोलन खटकत आहे" असं म्हटलं आहे.

"कधी-कधी वाटतं की पंतप्रधान मोदींना काँग्रेसची खरी गरज आहे. जर काँग्रेस राहिली नाही तर पंतप्रधानांचं काय होईल?" असं म्हणत यादव यांनी हल्लाबोल केला आहे. "दुसऱ्यांच्या आधारावर जगणाऱ्याला परजीवी म्हणतात. पंतप्रधान मोदी यांनी आज एक नवा शब्द जन्माला घातला आहे. तो म्हणजे आंदोलनजीवी. पंतप्रधान मोदी आम्हाला घाबरत आहेत. ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी त्यांना अशा पद्धतीचं बोलण शोभा देत नाहीत" असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

"हो मी आंदोलनजीवी आहे. कारण भारताला स्वातंत्र्य एका आंदोलनामुळेच मिळालं आहे. या देशाने अनेक मोठमोठी आंदोलनं पाहिली आहेत. त्या आंदोलनाच्या माध्यमातूनच परिवर्तन झालं आहे. काँग्रेस काळात पंतप्रधान मोदीच जनआंदोलनाची गोष्ट करत होते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरुन त्यांच्या पक्षानंही आंदोलनं केली होती" असं देखील योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावरून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

आंदोलनजीवी टोळीपासून बचाव करा, नवा FDI म्हणजे फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी; पंतप्रधानांचा निशाणा

आम्ही 'बुद्धीजीवी' हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं 'आंदोलनजीवी' झाले आहेत. देशात काहीही झालं की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्यालाला त्यांच्यापासून वाचायला हवं, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निशाणा शाधला. "जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही," असंही मोदी म्हणाले. सध्या नवा FDI आला आहे. त्या 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी'पासून आपल्याला वाचलं पाहिजे, असंही आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलताना मोदींनी नमूद केलं. 

"18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?"

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारला "18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?" असा प्रश्न विचारला आहे. लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ग्रेटा थनबर्ग वरून निशाणा साधला आहे. "सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या व्यक्तींना भरकटवलं जात आहे. आपला देश एवढा कमकुवत आहे का? की विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलल्याबद्दल 18 वर्षीय मुलीला (ग्रेटा थनबर्ग) आपल्याकडे शत्रू मानलं जात आहे?" असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं. 

 

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीGreta Thunbergग्रेटा थनबर्ग