शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka CM: येडीयुराप्पा मुख्यमंत्री पद सोडणार; नव्या मुख्यमंत्र्याबाबत म्हणाले, 'सायंकाळपर्यंत समजेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 14:44 IST

Yeddyurappa can resign soon: नवीन मुख्यमंत्री कोण असेल याच्या नावाची घोषणा आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. दिल्लीच्या हायकमांडकडून निर्णय येणार आहे, असे येडीयुराप्पा म्हणाले.

कर्नाटकमध्य़ेमुख्यमंत्री (Karnataka CM) बदलाचे वारे वेगाने वाहू लागले असून आज सायंकाळपर्यंत नवीन मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे खुद्द मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा (bs yediyurappa) यांनीच संकेत दिले आहेत. यामुळे येडीयुराप्पा मुख्यमंत्री पदावरून पायऊतार होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. (Yediyurappa will  resign as a CM tomorrow, announcement of New CM Today Evening expected.)

लिंगायत: राजीव गांधी, अडवाणींसारखी चूक परवडणार नाही; येडीयुराप्पांबाबत भाजपा सावध

नवीन मुख्यमंत्री कोण असेल याच्या नावाची घोषणा आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. दिल्लीच्या हायकमांडकडून हे नाव येणार आहे, असे येडीयुराप्पा म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु झाले होते. तेव्हा काही नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होती. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. 

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण? (Who is next CM of Karnataka)

2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. तर आता निरानी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे नाव चर्चेत आहे. यामुळे या दोघांपैकीच मुख्यमंत्री होणार की लिंगायत समाजाचा नेता सोडून अन्य कोणत्या समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच

येडीयुराप्पांच्या तीन अटी...येडीयुराप्पा हे गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. दोन दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi), गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah)  आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यात येत त्यांनी 26 जुलैरोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. आज दिल्लीतून आदेश येताच उद्या येडीयुराप्पा बैठकीत राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत. 

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री