शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

पुढच्या राजकारणाची पायाभरणी करणारे वर्ष; राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 06:51 IST

सरत्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते.

गौरीशंकर घाळेमुंबई : सरत्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते. अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाल्यावर नेहमीच्या राजकारणाला चेव चढला आहे. लाॅकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे झालेले हाल, रोजगाराचा प्रश्न, कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार यासोबतच बाॅलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध शिवसेना, मेट्रो कारशेड आणि ईडीच्या नोटिसांभोवती यावर्षीचे राजकारण फिरत राहिले.

राज्यात महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग

राज्यात महाविकास आघाडीचा नवा राजकीय प्रयोग सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. वाॅर्ड आणि विभागस्तरावरील नेते, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था आहे. आघाड्यांच्या बाबतीत असलेल्या अनिश्चिततेमुळे स्थानिक पातळीवरील नेते सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ याच भूमिकेत आहेत. निवडणुका एकत्र लढण्याची भाषा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असली तरी काँग्रेसने भूमिका जाहीर केलेली नाही. तर, भाजप सध्याचे संख्याबळ राखण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. कृष्णकुंजवर शिष्टमंडळांचा राबता वाढला असला तरी त्याचा निकालात लाभ उठविण्यासाठी संघटनेची जोड देण्याचे आव्हान मनसेसमोर कायम आहे.

राष्ट्रवादी संधी साधण्याच्या तयारीत 

राज्यात सत्ता येताच राष्ट्रवादीने मुंबईवर लक्ष केंद्रित केले. कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पालिका निवडणुकीचे बिगुलही वाजविले गेले. पण, लाॅकडाऊनमुळे त्याला ब्रेक लागला. आता सत्तेच्या माध्यमातून प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्र्यांचा जनता दरबार याकामी पूरक ठरेल असा होरा आहे. मुंबई अध्यक्ष  नवाब मलिक यांनी स्थानिक पातळीवर आक्रमकपणे संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पाठीराखे पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मातोश्रीला सत्तेचे कवच

कोरोना काळात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वीच मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत पालिकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीमुळे हिंदुत्व त्यागले नाही, हा संदेश देण्याची एकही संधी वाया जाणार नाही याची खबरदारी शिवसेना नेतृत्वाकडून घेतली जात आहे. जोडीला मराठीचा मुद्दा तेवत ठेवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. कंगना रनौत प्रकरण अनावश्यकपणे अंगावर ओढवून घेतल्यानंतर त्याची पुनरावृत्ती टाळण्यावर भर दिला गेला. 

भाजप- जुन्या शिलेदारांचे काय होणार?  

मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद आहे.  रस्त्यावरील राजकारणाच्या त्यांच्या मर्यादा लक्षात घेता आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे प्रभारी पद सोपविण्यात आले. विनोद तावडे यांची राष्ट्रीय राजकारणात पाठवणी झाली आहे. तर, मागील पालिका निवडणुका गाजविणारे आशिष शेलार काहीसे बाजूला फेकले गेल्याची चर्चा आहे. शह-काटशह भाजपसमोरील मोठे आव्हान आहे. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा