सभापतीपद वाचवणार का? बहुमत असूनही भाजपाची राजकीय कोंडी, शिवसेना पुन्हा बाजी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:20 PM2021-03-01T17:20:04+5:302021-03-01T17:22:44+5:30

Ulhasnagar Municipal Corporation: उल्हासनगर महापालिका विशेष समिती सभापती पदासाठी चढाओढ, भाजपा समिती सभापती पद वाचविणार का?

Will you save the post of Speaker? Politics Happening between BJP Shivsena in Ulhasnagar Corporation | सभापतीपद वाचवणार का? बहुमत असूनही भाजपाची राजकीय कोंडी, शिवसेना पुन्हा बाजी मारणार?

सभापतीपद वाचवणार का? बहुमत असूनही भाजपाची राजकीय कोंडी, शिवसेना पुन्हा बाजी मारणार?

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या सत्ताधारी आघाडी मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आठवले गट आदी पक्ष सहभागी आहेत. विशेष समितीच्या एकून ९ सदस्यांपैकी भाजपचे ५ तर शिवसेना, रिपाइं व राष्ट्रवादी पक्षाचे ४ सदस्य आहेतभाजपचे स्पष्ट बहुमत असलेतरी सर्वच सभापती पदे हिसकावून आणण्यासाठी सत्ताधारी आघाडी रणनीती

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेत स्पष्ट बहुमत असतांना शिवसेना आघाडीने भाजपला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व प्रभाग समिती सभापती पदी धोबीपछाड दिली. विशेष समिती सभापती पदाची निवडणुक ९ मार्चला होणार असून शिवसेना आघाडी पुन्हा भाजपला धोबीपछाड देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांना भाजपातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने शिवसेना आघाडीने महापौर, उपमहापौर पदासह स्थायी समिती सभापती व विशेष समिती सभापती पद भाजप कडून हिसकावून घेतले आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली असून त्यापूर्वी भाजपला विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुकीत धक्कातंत्र देण्याची रणनीती सत्ताधारी आघाडीतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, उपशहरप्रमुख अरुण अशान, राष्ट्रवादीचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री आखत आहेत. एकूण ९ विशेष समिती सभापती पदासाठी ४ मार्च रोजी अर्ज भरण्याची तारीख असून ९ मार्च रोजी सभापती पदाची निवडणूक होणार आहे.

महापालिकेच्या सत्ताधारी आघाडी मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आठवले गट आदी पक्ष सहभागी आहेत. विशेष समितीच्या एकून ९ सदस्यांपैकी भाजपचे ५ तर शिवसेना, रिपाइं व राष्ट्रवादी पक्षाचे ४ सदस्य आहेत. विशेष समिती मध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असलेतरी सर्वच सभापती पदे हिसकावून आणण्यासाठी सत्ताधारी आघाडी रणनीती आखत आहे. तर भाजपच्या शहराध्यक्ष पदी जमनुदास पुरस्वानी यांची निवड झाली तेंव्हा पासून भाजपला पराभवाचे धक्के बसत असून विशेष समिती सभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले. शिवसेना, ओमी कलानी टीमचे बंडखोर नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीआरपी आदी पक्षाकडे विशेष समितीचे सभापती पदे जाण्याची शक्यता असून त्यांच्या मध्ये सभापती पदे मिळण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. 

भाजपची राजकीय कोंडी कायम

महापालिकेत स्पष्ट बहुमत असतांना भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने शिवसेना आघाडीने, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व प्रभाग समिती सभापती पद भाजपकडून हिसकावून घेतली. विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही भाजपची कोंडी करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आघाडी रणनीती आखत आहेत. एकूणच बहुमत असून भाजपची राजकीय कोंडी करण्यात शिवसेना आघाडीला यश आले आहे.

Web Title: Will you save the post of Speaker? Politics Happening between BJP Shivsena in Ulhasnagar Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.