शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

उत्तर कर्नाटकातील भाजपचा वारू काँग्रेस रोखणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 04:02 IST

काँग्रेसला परत मिळवायचा आहे बालेकिल्ला; गतनिवडणुकीत भाजपने जिंंकल्या होत्या ११ जागा

- पोपट पवार शिमोगा : २०१४च्या लोकसभा निवडणुकीत लिंंगायत समाजाच्या पाठबळावर उत्तर कर्नाटकातील १४ पैकी तब्बल ११ जागा जिंंकून एकेकाळच्या काँग्रेसच्याच बालेकिल्ल्याला भगदाड पाडणाऱ्या भाजपचा उत्तर कर्नाटकातील वारू रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. येत्या २३ एप्रिल रोजी उत्तर कर्नाटकातील १४ जागांसाठी तिसºया टप्प्यांत मतदान होणार आहे.माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा, बी. एस. येडियुुरप्पा, धरङ्कसिंंह, काँग्रेसचे संसदेतील नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी या प्रांताचे प्रतिनिधित्व केल्याने मुंबई कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक म्हणून ओळखला जाणारा हा उत्तर प्रांत कर्नाटकच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. लिंंगायत समाजाचे सर्वाधिक प्राबल्य असलेल्या उत्तर कर्नाटकाने स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा हात नेहमीच बळकट केला आहे. मात्र, देशाच्या राजकारणात भाजपला दक्षिणेचा दरवाजा पहिल्यांदा खुला करून देणाºया कर्नाटकात भाजपने आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केल्यानंतर उत्तर कर्नाटकाने त्याला पहिल्यांदा साथ दिली अन् येथील काँग्रेसचे अनेक बुरूज ढासळले गेले. अर्थात, भाजपने जातीय समीकरणांचा आधार घेतल्यानेच या प्रांतात काँग्रेसेतर पक्षाकडे मतदार आकर्षिले गेले होते.उत्तर कर्नाटकातील भाजपची वाढलेली लोकप्रियता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लिंंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा घेतलेल्या निर्णयासाठी लिंंगायतबहुल भागात अपेक्षित यश मिळाले नसल्याने काँग्रेस चिंंतेत आहे. स्वतंत्र धर्माच्या मुद्यावरून वीरशैव-लिंंगायत यांच्यात सुरु असलेला वादही त्याला कारणीभूत असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. लिंंगायत-वीरशैव यांच्या वादात काँग्रेसने पडायलाच नको होते, असे सांगत काँग्रेसचे वजनदार मंत्री डी. के. शिवकुमार यांनी माफी मागितल्याने काँग्रेसअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्वतंत्र लिंंगायत धर्माची मागणी करणाºया काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवकुमार यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवित नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे मंत्री ए. बी. पाटील यांनी २०१७ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले कथित पत्र व्हायरल झाल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. या पत्रात भाजप आणि राष्टÑीय स्वयंसेवक संघाला रोखण्यासाठी हिंदू धर्मात फूट पाडण्याची गरज आहे. स्वतंत्र लिंंगायत धर्माचे आंदोलन पेटले तरच काँग्रेसला लाभ होईल, असा मजकूर आहे. अर्थात, हे पत्र खोटे असून आपल्या विरुद्ध रचलेले हे कटकारस्थान असल्याचा आरोप पाटील यांनी केला असला तरी भाजपने हाच मुद्दा उचलत प्रचाराचे रान तापवले.खुद्द नरेंद्र मोदी यांनीही या मुद्यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी उत्तर कर्नाटकात प्रचाराची राळ उडवून दिल्याने येथील अनेक जागांवर चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. उत्तर कन्नडमध्ये तब्बल ५ वेळा विजय मिळवणारे भाजपचे अनंतकुमार हेगडे यांच्यासमोर जेडीएसच्या आनंद असनोटीकर यांनी तगडे आव्हान उभे केल्याने येथील लढतही रंगतदार होण्याची शक्यता आहे. धारवाडमधून भाजपच्या प्रल्हाद जोशी यांच्यासमोर स्वतंत्र लिंंगायत धर्माचे पुरस्कर्ते विनय कुलकर्णी यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या लढतीनेही लक्ष वेधले आहे.बेल्लारी कुणाकडे...१९९९ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यातील लढतीने रंगतदार बनलेला हा मतदारसंघ. खाणसम्राट रेड्डी बंधूंच्या अचाट संपत्तीने देशाचे डोळे दीपवणाºया या मतदारसंघात यंदा भाजप-काँग्रेसमध्येच थेट लढत होत आहे. काँग्रेसकडून वी. एस. उगरप्पा तर भाजपकडून वाय. देवेंद्रप्पा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या श्रीरामुलू यांनी विजयश्री प्राप्त केली होती. मात्र, विधानसभेसाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा या मतदारसंघाने आपला कौल काँग्रेसच्या पारड्यात टाकला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात शिवसेनेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस