शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबई महापौर काँग्रेसचा, नेत्यांनी केला स्वबळाचा निर्धार; मतभेद विसरून काम करूयात" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 14:33 IST

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले

ठळक मुद्देआता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागातन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे.

मुंबई:  आत्तापासून एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेस शिवाय महापौर नाही, असा  ठाम विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नुकताच जोगेश्वरीत व्यक्त केला. मुंबईतील प्रत्येक घरात पोहचण्यासाठी लवकरच प्रत्येक वार्डात पदयात्रा काढणार आहे अशी माहिती त्यांनी  जोगेश्वरीतील उत्तर पश्चिम कार्यकर्ता मेळाव्यात दिली.यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक भाऊ जाधव व बलदेव खोसा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष कलाइव्ह डायस तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता रस्त्यावर उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर २२७ जागांवर आपण लढणार आहोत, तेव्हा जोमाने कामाला लागा, असा स्वबळाचा पुरुच्चार भाई जगताप त्यांनी या मेळाव्यात केला. 

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था डबगाईला पोहचली आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, गॅस सिलेंडर ७०० रुपये झाला, पेट्रोल ९३ रुपये पोहचले, भाजप जातीयवाद, भाषा वाद व प्रांत वाद पसरवतात, काँग्रेस नेहमी सर्व धर्म समभाव विचाराने चालते, सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाते, भेदभाव करत नाही. इस्त्रायल दूतावासात बॉम्बस्फोट झाला, या प्रकरणात दिल्ली पोलिसांचे व गृहमंत्रालयाचे अपयश आहे. गृहमंत्री अमित शहाचे अपयश असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी चरणसिंग सप्रा यांनी यावेळी केली.     माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, मनपा निवडणूक समोर आहे, काँग्रेसचे रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक निवडून आले पाहिजेत. आपण भाई जगताप आणि चरणसिंग सप्रा या दोघांच्या सोबत आहे. तन मन धन लावून आपण सगळे काम करूयात. सर्वांनी मतभेद विसरायची वेळ आली आहे. मुंबईत आजही काँग्रेस सर्वात मोठी पार्टी आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबई