शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या असताना नव्या संसदेवर खर्च कशाला?: कमल हसन

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 14:44 IST

सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे. 

ठळक मुद्देनव्या संसदेच्या निर्माणावर कमस हसन यांचा आक्षेपकोरोना काळात खर्चीक प्रकल्प राबविण्याची गरज काय?, हसन यांचा सवालपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं नव्या संसदेचं भूमिपूजन

नवी दिल्लीनव्या संसदेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकताच पार पडला. अभिनेते आणि मक्कल निधी माईम पक्षाचे नेते कमल हसन यांनी या नव्या संसदेच्या गरजेबाबतचे काही सवाल उपस्थित केले आहेत. 

सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे. कमल हसन यांनी एक ट्विट केलं आहे. "चीनच्या भिंतीची निर्मिती होत असताना हजारो लोक मारले गेले. पण त्यावेळी प्रशासनानं दावा केला होता की लोकांच्या सुरक्षेसाठी भिंत उभारणं गरजेचं होतं. आता भारतात नव्या संसद भवनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. देशात कोरोनाकाळात अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना भूकेलं राहावं लागलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मग अशावेळी नव्या संसदेची गरज आहे का?", असं कमल हसन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. संसद भवनाची निर्मिती हा खरंतर २० हजार कोटींच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. सरकारच्या योजनेनुसार चार मजली संसद भवन हे ६४,५०० वर्ग मीटर परिसरात तयार केले जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच २०२० साली नव्या संसदेचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. नव्या संसदेत लोकसभेच्या सभागृहात ८८८ इतकी आसन व्यवस्था असणार आहे. तर सेंट्रल हॉलमध्ये १२२४ इतकी आसन क्षमता असणार आहे. अत्याधुनिक सुविधांसह भूकंप विरोधी इमारतीचं बांधकाम असणार आहे.  

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा