शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

"विकासाशी शत्रूसारखे का वागताय? का महाराष्ट्रद्रोह करताय?’’ उद्धव ठाकरेंना सवाल

By बाळकृष्ण परब | Published: December 19, 2020 11:34 AM

Mumbai Politics : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची तयारी ठाकरे सरकारने केली आहे.

मुंबई - कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्प न्यायालयीन लढाईत अडकण्याची चिन्हे निर्माण झाल्याने आता ही कारशेड बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची तयारी ठाकरे सरकारने केली आहे. दरम्यान, ठाकरे सरकारकडून उचलण्यात येत असलेल्या पावलांवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे. विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागताय, का महाराष्ट्रद्रोह करताय, अशी विचारणा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजना नुसार बीकेसील भूखंडावर भूभागात बुलेट ट्रेनचे स्टेशन तर पृष्ठभागावर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अशी आखणी करण्यात आली. मात्र आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर जाईल. असे करून का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. 

आपल्या पुढच्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये, अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय...? मुंबईकरांनो ठाकरे सरकारच्या या तीन तिघाड्यामुळे मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी वातानुकूलित बैलगाडा मिळणार आहे. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAshish Shelarआशीष शेलारPoliticsराजकारण