शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 11:39 IST

गुजरातमधील रोड शोवेळी उद्धव यांचा महाआघाडीवर हल्लाबोल

अहमदाबाद: एनडीएविरोधात महाआघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आमचा नेता एक आहे. विरोधकांनी त्यांचा नेता कोण ते एकदा सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शहा आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी भाजपाकडून रोड शो करण्यात येत आहे. या रोड शोआधी एनडीएच्या नेत्यांची भाषणं झाली. त्यावेळी उद्धव यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला.उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी उपस्थितांनी 'मोदी, मोदी' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी आमचा नेता एक आहे. पण महाआघाडीचा नेता कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'आमच्या रॅलींमध्ये मोदींच्या नावानं घोषणाबाजी होते. विरोधकांनी त्यांची एक रॅली काढून दाखवावी आणि त्यावेळी तिथे जमलेल्यांना एका व्यक्तीच्या नावानं घोषणा द्यायला सांगाव्यात,' असं आव्हान उद्धव यांनी दिलं. महाआघाडीतील पक्षांच्या, नेत्यांच्या विचारात साम्य नाही. कायम एकमेकांचे पाय खेचणारे नेते आज एकत्र आले आहेत. त्या सर्वांनाच पंतप्रधान व्हायचं आहे, अशी टीका उद्धव यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये शिवसेना-भाजपामध्ये निर्माण झालेल्या दुराव्यावरदेखील त्यांनी भाष्य केलं. 'आज मी इथे आल्याचं पाहून काहींच्या पोटात दुखत आहे. त्याचा इलाज माझ्याकडे आणि अमित भाईंकडे आहे. आमच्यातली भांडणं पाहून काहींना आनंद झाला होता. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन भांडत होतो. पण आता आमच्यातले वाद संपले आहेत. कारण आमचे विचार सारखे आहेत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. आम्हाला खुर्चीची ओढ नाही. 25 वर्षे आम्ही सत्तेशिवाय एकत्र होतो. एक भगवा घेऊन आम्ही 25 वर्षे वाटचाल केली. त्यावेळी सोबतीला कोणीच नव्हतं. दिल्लीवर भगवा फडकावण्याचं आमचं स्वप्न होतं. ते 25 वर्षांनी पूर्ण झालं,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाBJPभाजपाShiv Senaशिवसेना