शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

नवमतदारांचा कौल कोणाला?

By यदू जोशी | Published: April 18, 2019 5:12 AM

विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले.

- यदु जोशीमुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यात निवडणूक आयोगाने राबविलेली विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेषत: नवमतदारांची उत्स्फूर्तता यामुळे फेब्रुवारी आणि मार्च २०१९ या दोन महिन्यात १२ लाख ३० हजार ८६१ नवे मतदार नोंदविले गेले. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी राबविलेले अभियान, त्यासाठी जाहिरातींद्वारे केलेली जनजागृती आणि नवमतदारांचा प्रतिसाद यामुळे दोन महिन्यात १२ लाख ३० हजार मतदार वाढले. निवडणूक निकाल बदलवू शकेल इतकी मोठी ही संख्या आहे. नवमतदारांचा कौल त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.या मतदारांपैकी ८५ टक्के हे नवमतदार असून ते या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आहेत. ३० मार्चपर्यंत राज्यात मतदार नोंदणीचे काम सुरू होते. त्यानंतर आता आयोगाने राज्यातील एकूण अंतिम मतदारसंख्या दिली आहे. त्यानुसार आता राज्यात ८ कोटी ८५ लाख ६१ हजार ३४५ मतदार आहेत. दोन महिन्यांपूर्वी हाच आकडा ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ इतका होता. पुरुष मतदारांची एकूण संख्या ४ कोटी ६३ लाख १४ हजार ७७६ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी २२ लाख ४४ हजार ३७ आहे.पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीने प्रभावित तरुणाईने भरभरुन मतदारनोंदणी केली, असे भाजपचे म्हणणे आहे. तर मोदी यांच्या कारभाराचे वाभाडे निघत असताना बघून हे सरकार पुन्हा नको, या भावनेने मोठ्या प्रमाणात नवमतदारांनी नोंदणी केली, असे काँग्रेसने म्हटले आहे. दोन महिन्यांत साडेबारा लाखने वाढलेले हे मतदार कुणाकडे वळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.महिला उमेदवार वाढले२०१४ मध्ये राज्यात ६९ महिला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यावेळी ही संख्या ११ ने वाढून ८० इतकी झाली आहे. राज्यात सध्या भावना गवळी, सुप्रिया सुळे, प्रीतम मुंडे, पूनम महाजन, रक्षा खडसे आणि हिना गावित या ६ महिला खासदार आहेत.२०८६ तृतीयपंथी मतदारराज्यात तृतीयपंथी मतदारांची एकूण संख्या २ हजार ८६ इतकी आहे. त्यात सर्वाधिक मतदारसंख्या (३२४) ही उत्तर मुंबईत आहे. बोटावर मोजण्याइतके कमी तृतीयपंथी मतदार असलेल्या मतदारसंघांमध्ये दक्षिण मुंबई, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, लातूरचा समावेश आहे.>सर्वाधिक मतदार ठाण्यातठाणे हा राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्येचा मतदारसंघ आहे. त्या खालोखाल मावळ, नागपूर, शिरुर, शिर्डी, पुणे या मतदारसंघांचा क्रम लागतो. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मुंबई दक्षिण-मध्य, गडचिरोली-चिमूर आदी मतदारसंघांत कमी मतदारसंख्या आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019