शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Who Killed Judge Loya? मुंबईच्या लोकल, बसमध्ये लोया हत्येविषयी जनजागृतीसाठी टीशर्ट आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 14:26 IST

न्यायाधीश लोयांच्या हत्येच्या चौकशीत दिरंगाई होत असल्याचा आरोप करुन त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आज मुंबईत टीशर्ट आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टीशर्टवर "Who Killed Justice Loya?" असे लिहिले होते.

आज सकाळपासून मुंबईच्या लोकल ट्रेन आणि बेस्ट बसमध्ये काही प्रवाशी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रवाशांचा हा समूह सामाजिक कार्यकर्त्यांचा आहे ज्यांनी घातलेल्या टीशर्टवर “व्हू किल्ड जस्टिस लोया?” म्हणजेच न्यायाधीश लोयांना कुणी मारलं? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या टीशर्टमुळे इतर मुंबईकर प्रवाशांचे लक्ष या कार्यकर्त्यांकडे वेधले जात असून नेमके हे प्रकरण काय आहे त्याची माहिती विचारली जात असल्याने आमचा उद्देश यशस्वी होत असल्याचा दावा विनोद चांद यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना केला.

विनोद चांद आणि त्यांचे काही सहकारी आज सकाळी अंधेरीत जमले. तेथून ते लोकलने बोरिवलीकडे गेले. सकाळची गर्दीची वेळ असल्याने स्वाभाविकरीत्या त्यांना तयार जनसमुदाय मिळत गेला. आणि टीशर्टमुळे लक्ष वेधणेही शक्य झालं. मात्र तरीही पोलिसांनी त्यांना प्रवाशांशी संवाद साधताना पाहून बोरिवली रेल्वे स्थानकात रोखलं. तेथे त्यांची चौकशी केली गेली. मात्र आम्ही रेल्वेचं तिकिट विकत घेऊन कायदेशीर प्रवास करत आहोत. टीशर्ट घातलेला असला तरी त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत नसल्याचा युक्तिवाद विनोद चांद यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे टीशर्ट आंदोलन चर्चगेट लोकलने चर्चगेटच्या दिशेला वळवले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते चर्चगेट स्थानकात जमले होते. टीशर्ट आंदोलनाच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये न्यायाधीश लोया प्रकरणाविषयी जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरुच राहणार आहे.

न्यायाधीश लोया यांची हत्या झाली असून चौकशीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जनजागृतीसाठी आपण हे टीशर्ट आंदोलन सुरु केल्याचे विनोद चांद यांनी सांगितले. देशातील काही मोठी माणसं या प्रकरणात गुंतलेली असल्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सामान्यांना या प्रकरणाचा विसर पडू नये यासाठी आपण हे वेगळं आंदोलन कायद्याच्या कक्षेतच सुरु केल्याचा दावाही त्यांनी केला.

 

 

टॅग्स :Judge Loyaन्यायाधीश लोयाMumbaiमुंबईnagpurनागपूर